रिझर्व्ह बॅंकेचा कर्जदारांना दिलासा 

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 29 डिसेंबर 2016

मुंबई - नोटाबंदीने हैराण झालेल्या जनतेला दिलासा देणारा निर्णय रिझर्व्ह बॅंकेने बुधवारी घेतला. एक कोटी रुपयांपर्यंतच्या गृह, मोटार आणि शेतीसह अन्य कर्जांचा हप्ता भरण्यासाठी आधी दिलेल्या साठ दिवसांच्या मुदतीत आणखी तीस दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे. 

रिझर्व्ह बॅंकेने म्हटले आहे की, एक कोटी रुपयांपर्यंतच्या कर्जासाठी आधी साठ दिवसांची मुदतवाढ देण्यात आली होती. आता यात आणखी 30 दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे. यामुळे कर्जदारांना एकूण 90 दिवसांचा अवधी मिळणार आहे. त्यांनी या कालावधीत हप्ता न भरल्यास त्यांचे कर्ज थकीत कर्जामध्ये गृहित धरले जाणार नाही. ही सवलत 1 नोव्हेंबर ते 31 डिसेंबर 2016 या कालावधी देय असलेल्या कर्जाच्या हप्त्यासाठी आहे. 

नोटाबंदीमुळे रोकडटंचाई निर्माण झाल्याने कर्जदारांना हप्ता भरण्यासाठी मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही सवलत एक कोटी रुपयांपर्यंतच्या सर्व प्रकारच्या कर्जासाठी आहे. 1 नोव्हेंबरपासून देय असलेला हप्ता 90 दिवसांपर्यंत न भरल्यास तो आता थकीत धरण्यात येणार आहे. ही सवलत 31 डिसेंबरपर्यंतच्या कर्जाच्या हप्त्यासाठी असून, पुढील वर्षातील हप्त्याबाबत अद्याप काही सूचना करण्यात आलेली नाही. 

Web Title: Reserve Bank borrowers relief