वैद्यकीय पदव्युत्तर प्रवेशात राज्यासाठी राखीव जागा

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 29 एप्रिल 2017

मुंबई - राज्यातील विद्यार्थ्यांना जास्त प्रमाणात वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमात प्रवेश मिळावा यासाठी राखीव जागा ठेवण्याचा निर्णय वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाने घेतला आहे.

मुंबई - राज्यातील विद्यार्थ्यांना जास्त प्रमाणात वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमात प्रवेश मिळावा यासाठी राखीव जागा ठेवण्याचा निर्णय वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाने घेतला आहे.

खासगी विनाअनुदानित महाविद्यालयांतील वैद्यकीय व दंत पदव्युत्तर अभ्यासक्रमाला प्रवेश देताना राज्यातील उमेदवारांना अग्रक्रम देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. खासगी विनाअनुदानित महाविद्यालयांतील पदव्युत्तर वैद्यकीय व दंत अभ्यासक्रमासाठी राज्याच्या कोट्यातील 50 टक्के जागा दिल्या जातील. राज्यातून एमबीबीएस उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना या सुविधेचा लाभ घेता येईल. 2017-18 या शैक्षणिक वर्षापासून प्रवेश प्रक्रिया राबवण्याची जबाबदारी राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडे राहील.

Web Title: reserve seat for medical post graduate admission