मुंबईला राखीव पाणी!

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 2 जून 2019

अपुऱ्या पावसामुळे वर्षभरापासून मुंबईकरांना पाणी कपातीची झळ सोसावी लागत आहे. यंदाही मान्सून लांबणार असल्याने नागरिकांच्या तोंडचे पाणी पळण्याची शक्‍यता आहे. सध्या धरणांत अवघा १० टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे राखीव साठ्यातून पाणीपुरवठा करण्याची वेळ महापालिका प्रशासनावर आली आहे. त्यासाठी राज्य सरकारकडून परवानगीही घेण्यात आली आहे.

मुंबई - अपुऱ्या पावसामुळे वर्षभरापासून मुंबईकरांना पाणी कपातीची झळ सोसावी लागत आहे. यंदाही मान्सून लांबणार असल्याने नागरिकांच्या तोंडचे पाणी पळण्याची शक्‍यता आहे. सध्या धरणांत अवघा १० टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे राखीव साठ्यातून पाणीपुरवठा करण्याची वेळ महापालिका प्रशासनावर आली आहे. त्यासाठी राज्य सरकारकडून परवानगीही घेण्यात आली आहे. १५ जूनपासून राखीव साठा वापरला जाईल. सध्या सुरू असलेली १० टक्के कपात वाढवण्याची गरज नसली, तरी पाण्याच्या थेंबाथेंबाची बचत करावी लागणार आहे.

२०१८ मध्ये मुंबईत मान्सून ९ जूनला दाखल झाला होता; मात्र यंदा केरळमध्येच मान्सून ६ जूनपर्यंत दाखल होणार असल्याचा अंदाज केंद्रीय वेधशाळेने व्यक्त केला आहे. त्यामुळे मुंबई आणि ठाण्यात मान्सून दाखल होण्यास किमान ८ ते ९ दिवसाचा विलंब होणार असल्याने पाणी कपातीचे प्रमाण वाढवावे लागले असते. ते टाळण्यासाठी राखीव साठ्यातून पाणी देण्याची मागणी महापालिकेने राज्य सरकारकडे 

महापालिकेच्या जलअभियंता विभागामार्फत सांगण्यात आले.
मुंबईला वर्षभर सुरळीत पाणीपुरवठा होण्यासाठी ऑक्‍टोबरच्या सुरुवातील १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर पाणीसाठा आवश्‍यक असतो. परंतु, गतवर्षी १ ऑक्‍टोबरला तब्बल दोन लाख दशलक्ष लिटर पाणीसाठा कमी असल्याचे समोर आले. या पार्श्‍वभूमीवर उपलब्ध पाणीसाठ्यातून पावसाळ्यापर्यंत पुरेशा पाणीपुरवठ्याचे नियोजन करण्यासाठी नोव्हेंबर २०१८ पासून मुंबईत १० टक्के पाणीकपात सुरू करण्यात आली. मुंबईतील अनेक भागांत तीव्र पाणीटंचाई जाणवत आहे. पाणीपुरवठा केला जाणाऱ्या शेवटच्या भागांत दुर्भिक्ष असल्याच्या तक्रारी आहेत. तेथील नागरिकांना दररोज टॅंकरचे पाणी विकत घ्यावे लागते. काही ठिकाणी दोन-तीन दिवसांतूून एकदा टॅंकरद्वारे पाणी मिळते. डोंगराळ भागांतही तीव्र टंचाई आहे. असे असले, तरी मुंबईत आणखी पाणीकपात होणार नसल्याचे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले. 

जुलैअखेरपर्यंत दिलासा 
राखीव साठ्यासह तलावांत सध्या तीन लाख १३ हजार ८५९ दशलक्ष 
लिटर पाणी आहे. ते जुलैअखेरपर्यंत पुरेल, असा दावा महापालिका प्रशासनाने केला. सात तलावांतील एक लाख ४३ हजार ८५९ दशलक्ष लिटर आणि भातसा-वैतरणाच्या जलाशयांतील एक लाख ७० हजार दशलक्ष लिटर राखीव पाणीसाठा शनिवारी (ता. १) खुला करण्यात आला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Reserved water for mumbai, monsoon water storage