esakal | शे.का.प नेत्या रेश्मा जोशी यांचा शिवसेनेत प्रवेश
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai

शे.का.प नेत्या रेश्मा जोशी यांचा शिवसेनेत प्रवेश

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अलिबाग : शेकाप नेत्यांच्या अरेरावीला वैतागून पोयनाड ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच रेश्मा जोशी यांनी आपल्या रविवार रोजी वाढदिवसाचे औचित्य साधून शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेना रायगड जिल्हा प्रमुख आमदार महेंद्र दळवी शिवसेना अलिबाग तालुका प्रमुख राजा केणी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून रेश्मा जोशी यांनी रायगड (raigad) जिल्हा परिषदेच्या गट नेत्या सौ.मानसी दळवी यांच्या उपस्थितीत प्रवेश केला.

या पक्षप्रवेशाने पोयनाड ग्राम पंचायतीमधील राजकीय समिकरणे बदलणार आहेत. आपल्या जनसंपर्काने कुर्डुस विभागात शिवसेना अधिक बळकट करणार असल्याचे रेश्मा जोशी यांनी पक्ष प्रवेश करताना महेंद दळवी यांना आश्वासन दिले आहे. शेकापचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या जिल्हा परिषदेच्या कुर्डुस मतदार संघात एकामागून एक शेकापचे कार्यकते शिवसेनेत प्रवेश करीत आहेत. पुढील भव्य पक्षप्रवेश पेझारी नाक्यावर करून शेकापला आणखी एक मोठा धक्का देणार असल्याचे आ. महेंद्र दळवी वक्तव्य केले आहे. सौ.रेश्मा जोशी यांनी आपल्या वाढदिवशीच शिवसेनेत प्रवेश केला.

हेही वाचा: विरोधी पक्षनेत्याचा शिवसेनेत प्रवेश; पक्षाची ताकद वाढणार

यावेळी शिवसेना रायगड जिल्हा प्रमुख आ. महेंद्र दळवी, जिल्हा परिषदेच्या गट नेत्या सौ.मानसी दळवी, शिवसेना अलिबाग तालुका प्रमुख राजा केणी उप तालुका प्रमुख प्रकाश पाटील विभाग प्रमुख योगेश जुईकर कुर्डूस जिल्हा परिषद मतदार संघाचे संपर्क प्रमुख,शैलेंद्र पाटील उप विभाग प्रमुख अरविंद पाटील, ग्रामपंचायत सदस्य जिवन पाटील , ग्रामपंचायत सदस्य तुषार शेरमकर डाॅ.अविनाश पाटील व कार्यकर्ते उपस्थित होते

loading image
go to top