निवासी डॉक्‍टरांच्या विद्यावेतनात वाढ 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 2 जानेवारी 2019

मुंबई - निवासी डॉक्‍टरांच्या विद्यावेतनात 5000 रुपये वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे, अशी माहिती मार्ड या निवासी डॉक्‍टरांच्या संघटनेने दिली. विद्यावेतनात वाढीचा मुद्दा नोव्हेंबरपासून रखडल्यामुळे मार्डने आक्रमक पवित्रा घेतला होता. त्यानंतर सरकारने विद्यावेतनात वाढ करण्याचा निर्णय घेतला, अशी माहिती मार्डचे अध्यक्ष डॉ. लोकेश चिरवटकर यांनी दिली. महिला निवासी डॉक्‍टरांना प्रसूतीसाठी रजा आणि क्षयरोगावरील उपचारांसाठी रजेबाबतही सकारात्मक निर्णय होत असल्याचे त्यांनी सांगितले. 

Web Title: Residential doctors salary increase

टॅग्स