ग्रीन वर्ल्ड इमारतीतील रहिवाशांचा आक्रोश

ग्रीन वर्ल्ड इमारतीतील रहिवाशांचा आक्रोश
ग्रीन वर्ल्ड इमारतीतील रहिवाशांचा आक्रोश

नवी मुंबई : नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील प्रस्तावित दिघा रेल्वेस्थानकाच्या बाजूला असणाऱ्या ग्रीन वर्ल्ड या इमारतीमध्ये बांधकाम व्यावसायिकांनी प्राथमिक सुविधा दिलेल्या नाहीत, असा आरोप येथील रहिवाशांनी केला असून, त्यांनी या बांधकाम व्यावसायिकांच्या कार्यालयासमोर शनिवारी (ता.16) त्यांच्याविरोधात घोषणाबाजी करत आक्रोश व्यक्त केला. 

प्रस्तावित दिघा रेल्वेस्थानकाच्या बाजूला "अक्षर' या बांधकाम व्यावसायिकांकडून ग्रीन वर्ल्ड इमारत बांधण्यात आली आहे. या इमारतीमध्ये फ्लॅट आहे. या इमारतीमध्ये रहिवासी राहण्यासाठी आले; मात्र या ठिकाणी वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने रहिवासी संतापले आहेत. या इमारतीला पालिकेकडून सीसी मिळाली आहे; मात्र अद्यापपर्यंत पिण्याच्या पाण्याची सोय नसल्यामुळे व्यावसायिकाकडून टॅंकरने पाणीपुरवठा केला जात आहे. पिण्याच्या पाण्याची योग्य सोय नसल्यामुळे येथील रहिवाशांना त्याचा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. याशिवाय सध्याची महत्त्वपूर्ण गरज असलेल्या इंटरनेट, केबलची सुविधा उपलब्ध नाही. सुरक्षेच्या माध्यमातून इमारतीच्या प्रवेशद्वारावर सुरक्षा रक्षक नेमले आहेत; मात्र, सीसी टीव्ही उपलब्ध नाही. इमारतीमध्ये नवरात्रीच्या वेळी देवीची दानपेटीदेखील चोरीला गेली असल्याचे येथील रहिवाशांनी सांगितले. सोसायटीमध्ये वाहने पार्क केल्यानंतर त्यामधील पेट्रोल चोरीला जाण्याच्या घटना घडतात. सुरक्षेसाठी बांधकाम व्यावसायिकांकडून सुरक्षा जाळी बसवून देण्यात येत नसल्याचा आरोप येथील रहिवाशांनी केला आहे. 

या सुविधांचा अभाव 
- पिण्याच्या पाण्याची सोय नाही 
- घरांना गळती 
- उद्‌वाहक अपुऱ्या 
- वारंवार वीजपुरवठा खंडित 
- इंटरनेट, केबलची सुविधा नाही 
- सीसी टीव्ही बसवलेले नाहीत 

पालिकेकडून ग्रीन वर्ल्ड या इमारतीला ओसी मिळाली आहे. त्यानंतर जलवाहिनी मिळण्यासाठी पालिका व एमआयडीसीकडून दोन्ही प्राधिकरणाला पत्रव्यवहार करण्यात आला असून, प्रशानाकडे पाठपुरावा सुरू आहे. येथील रहिवाशांकडून देखभाल खर्च घेण्यात आला आहे. मात्र या खर्चाचा वापर करण्यात आला नसून, स्व-खर्चातून टॅंकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. लवकरच इमारतीमध्ये सीसी टीव्ही बसविले जाणार आहेत. विद्युत जनित्र बसवण्यात आले आहे. वीजपुरवठा खंडित झाला तरीही उद्‌वाहक कार्यान्वित असते. 
- निखिल ठक्कर, बांधकाम व्यावसायिक, ग्रीन वर्ल्ड इमारत 
----------------कोट 
टॅंकरच्या पाण्यामुळे आंघोळ केल्यामुळे अंगाला खाज सुटत असून, केस गळत आहेत. बांधकाम व्यावसायिकाने संपूर्ण रक्कम घेतल्यानंतरही प्राथमिक सुविधा उपलब्ध नाहीत. पिण्याचे पाणी विकत घेण्यासाठी महिन्याला १५०० रुपयांचा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. बांधकाम व्यावसायिकाकडून सुरक्षेसाठी जाळी बसवून देण्यात येत नाही. वीजपुरवठा वारंवार खंडित होत आहे. 
- ज्योतिबा बोराटे, रहिवासी. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com