ठाण्यात श्‍वान मेळ्यास प्रतिसाद

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 24 फेब्रुवारी 2020

ठाणे : इमानी प्राणी म्हटला, की साऱ्यांनाच श्‍वान आठवतो. अशा या इमानदार श्‍वानांचा मेळा ठाण्यात भरला होता. ठाण्यातील डॉग वर्ल्ड या संस्थेने ठाण्यातील खेवरा सर्कल येथे आयोजित केलेल्या डॉग शोमध्ये अनेक श्‍वानांनी सहभाग दर्शवला. श्‍वान मेळ्याचे हे तिसरे वर्ष असून मोठ्या संख्येने यात श्‍वानप्रेमी नागरिकांनी हजेरी लावली.

"डोनाल्ड ट्रंप यांनी शिवभोजन थाळीचा रांगेत उभं राहून आस्वादही घेतला असता"

ठाण्यातील खेवरा सर्कल येथील खेवरा गार्डन येथे ठाणे पेट फास्ट आणि डॉग वर्ल्ड इंडिया यांच्या वतीने "ठाणे पेट फास्ट- 2020' डॉग शो आयोजित करण्यात आला होता. यामध्ये विविध प्रजातींच्या श्‍वानांनी सहभाग घेतला. अनेक कुटुंबांत पाळलेला श्‍वान म्हणजे कुटुंबांचा घटक असतो. तेव्हा पाळीव प्राण्यांबद्दल प्रेम निर्माण व्हावे, किंबहुना श्‍वान पाळण्याची आवड लोकांमध्ये वाढीस लागावी, या उद्देशाने ठाण्यात डॉग वर्ल्ड ही संस्था डॉग शोचे आयोजन करते.

पाकिस्तानी एजंटचा ई-मेल, ७ जण भारतात करणार दहशतवादी हल्ला...

यंदा त्यांचे तिसरे वर्ष आहे. या शोमध्ये सर्व जातीचे श्‍वान एकत्र मस्ती करतात, यात जम्प शो असतो; तर सर्वांत महत्त्वाचे म्हणजे डॉग रॅप शोदेखील असतो. या पेटप्रमाणे त्यांच्या मालकांमध्येही या शोबद्दल कुतूहल असते. 

शेतकऱ्यांच्या मुली सगळ्यांवर भारी; वाचा मस्त बातमी

या श्‍वान मेळ्यामध्ये जर्मन शेफर्ड, लॅब, मिनीपोम, चुवाह, पब, लहासा, गोल्डन रिट्रीवर, हस्की, पामेलियन या जातीच्या श्‍वानांनी भाग घेतला होता. माय पेट, माय हिरो हाच उद्देश असून आमच्यासाठी सर्वच पेट हे या शोचे विजेते आहेत. अशा शोमुळे नागरिकांना वेगवेगळ्या जातीचे श्‍वान पाहायला मिळतात. त्यामुळे असे डॉग शो झाले पाहिजेत. 
- भूषण देसाई,
श्‍वान मालक 

Response to the Dog Fair in Thane

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Response to the Dog Fair in Thane