बहुमत चाचणीची सर्वस्वी जबाबदारी अजित पवारांच्या खांद्यावर

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 30 नोव्हेंबर 2019

उद्धव ठाकरे थोड्याच वेळात बहुमत चाचणीला सामोरे जाणार आहेत. एक महिन्याच्या संघर्षानंतर आज उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीची अग्निपारीक्षा पार पडणार आहे. अशातच गेल्या काही काळात राजकारणाचा केंद्रबिंदू ठरलेले राष्ट्रवादीचे प्रमुख नेते अजित पवार यांच्याकडे आजच्या बहुमत चाचणीची संपूर्ण जबाबदारी देण्यात आली आहे. 

अजित पवार यांनी सर्व विधानसभा सदस्यांची बैठक देखील घेतल्याचं बोललं जातंय. गेल्या काही दिवसात महाराष्ट्रात महानाट्य पाहायला मिळालं. याच पार्श्वभूमीवर खुद्द अजित पवार यांच्याकडे देण्यात आलेली जबाबदारी अत्यंत महत्त्वाची ठरतेय.

आजच्या बहुमत चाचणीला समोरं जाण्याआधी गेल्या काळात ज्या 'व्हीप' ची चर्चा होती, तो व्हीप देखील बजावण्यात आलाय. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने उद्धव ठाकरे यांच्याबाजूने मतदान करण्याचं आवाहन आपल्या सर्व आमदारांना केलाय. जयंत पाटील यांच्या नावाने हा व्हीप बजावण्यात आलाय.

याचसोबत कॉंग्रेस आणि शिवेनेकडून देखील सर्व आमदारांना उद्धव ठाकरे यांच्या बाजूने मतदान करण्याचा व्हीप बजावला आहे. शिवसेनेने सर्व आमदारांना दोन्ही दिवस विधानसभेच्या कामकाजाला हजार राहण्याचे आदेश दिले आहेत.    

आज घेतल्या जाणाऱ्या बहुमत चाचणीसाठी महाविकास आघाडी तयार असल्याची माहिती महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांनी दिली. दरम्यान या सर्व नेत्यांकडून 'अब की बार 170' पार असा नारा देखील दिला जातोय.     

Webtitle : responsibility of floor test is on the shoulder of NCP leader ajit pawar 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: responsibility of floor test is on the shoulder of NCP leader ajit pawar