माओवादी विचारांच्या संकेतस्थळावर निर्बंध

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 12 डिसेंबर 2018

मुंबई - भारतीय कम्युनिस्ट पक्ष (माओवादी) या बंदी असलेल्या पक्षाचे विचार "बॅण्ड थॉट' या संकेतस्थळावरून प्रसारित केले जात असल्याचा आरोप आहे. त्यामुळे दूरसंपर्क विभागाच्या निर्देशांनुसार या संकेतस्थळावरील भारताशी संबंधित मजकूर "ब्लॉक' करण्यात आला आहे.

महाराष्ट्र पोलिसांच्या दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) केलेल्या तपासणीत या संकेतस्थळावर आक्षेपार्ह मजकूर असल्याचे निष्पन्न झाले होते. याबाबत केंद्र सरकारला माहिती देण्यात आली होती. त्यानुसार दूरसंपर्क विभागाने या संकेतस्थळावरील भारत आणि नेपाळशी संबंधित मजकुरावर निर्बंध घातले आहेत. भारतात बंदी असलेल्या भारतीय कम्युनिस्ट पक्ष (माओवादी) या संघटनेचे विचार या संकेतस्थळावरून प्रसारित केले जात असल्याचा आरोप आहे. या संकेतस्थळावरील भारताशी संबंधित भागावर 12 नोव्हेंबरपासून निर्बंध घालण्यात आल्याची माहिती "एटीएस' अधिकाऱ्यांनी दिली.

Web Title: Restrictions on Maoist Thinking Website