एमबीए सीईटीचा निकाल जाहीर 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 5 एप्रिल 2019

 एमबीए अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या एमबीए-एमएमएस सीईटी परीक्षेचा निकाल राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाच्या (सीईटी सेल) वतीने जाहीर करण्यात आला.

मुंबई - एमबीए अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या एमबीए-एमएमएस सीईटी परीक्षेचा निकाल राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाच्या (सीईटी सेल) वतीने जाहीर करण्यात आला. या परीक्षेमध्ये 20 विद्यार्थ्यांना 200 पैकी 150 हून अधिक, तर 677 विद्यार्थ्यांना 126 ते 150 पर्यंत गुण मिळाले आहेत. 

सीईटी सेलने 9 आणि 10 मार्चला राज्यातील 112 केंद्रांवर ही परीक्षा घेतली होती. राज्यभरातून एक लाख 11 हजार 846 विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यापैकी एक लाख दोन हजार 851 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. या विद्यार्थ्यांचे निकाल जाहीर करण्यात आले आहेत. यात 100 पर्यंत गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या अधिक आहे. मुंबईसह राज्यातील एमबीए अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी राज्य तंत्रशिक्षण संचालनालयाच्या अखत्यारितील महाविद्यालयांमध्ये सुमारे 35 हजार जागा आहेत. या जागांवर सीईटीमधील गुणवत्तेनुसार प्रवेश देण्यात येणार आहे. 

गुणांनुसार विद्यार्थी संख्या 
गुण - विद्यार्थी 
151-175 - 20 
126-150 - 677 
101-125 - 5013 
51-100 - 48614 
00-50 - 48527 

Web Title: The results of the MBA-MMS CET examination were announced by the State Civil Entrance Examination Class