निवृत्त अधिकाऱ्यांना एसटीत महत्त्वाची पदे

MSRTC
MSRTC

मुंबई - परिवहनमंत्री दिवाकर रावते यांच्या मर्जीतील निवृत्त अधिकाऱ्यांना एसटी महामंडळात महत्त्वाच्या पदांवर आणल्याचा आरोप सेवेतील अधिकाऱ्यांनी केला आहे. निवृत्त अधिकाऱ्यांना पुन्हा नियुक्ती दिल्याने पदोन्नती रखडणार असल्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांची नाराजी वाढत आहे.

एसटी महामंडळात नियोजन व पणन, कर्मचारीवर्ग व औद्योगिक संबंध या विभागांत अनेक पदांवर निवृत्त अधिकाऱ्यांना नेमण्यात आले आहे. अनेक महत्त्वाची पदे रिक्त असतानाही काही पदांवर राज्य सरकारी अधिकाऱ्यांना प्रतिनियुक्तीवर आणण्यात आले आहे. त्यामुळे पदोन्नती रखडल्याने एसटीच्या ज्येष्ठ अधिकाऱ्यांमध्ये नाराजी आहे. निवृत्त अधिकाऱ्यांना महत्त्वाची पदे देण्यात आली आहेत; अशा स्थितीत आर्थिक गैरव्यवहार झाल्यास जबाबदार कोणाला धरायचे, असा प्रश्‍न काही अधिकाऱ्यांनी उपस्थित केला.

नियोजन व पणन या विभागांतून एसटी महामंडळातील निविदा प्रक्रिया आणि योजना राबवण्यासंदर्भात निर्णय घेतले जातात. कर्मचारी व औद्योगिक विभागांतही महत्त्वाचे निर्णय घेतले जातात. हे विभाग "मलईदार' असल्यामुळे मंत्र्यांच्या मर्जीतील अधिकाऱ्यांची वर्णी लावण्यात आल्याचा आरोपही केला जात आहे. या संदर्भात परिवहनमंत्री आणि एसटी महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकांच्या प्रतिक्रिया मिळाल्या नाहीत. निवृत्तीनंतर नियोजन व पणन विभागाच्या महाव्यवस्थापकपदी आलेले माधव काळे यांनी, व्यवस्थापकीय संचालकांशी बोला, असे सांगितले.

एसटी महामंडळात मोठा भ्रष्टाचार होत आहे. त्यावर पांघरूण घालण्यासाठी बढत्या किंवा नवीन अधिकाऱ्यांना नियुक्ती न देता निवृत्त आणि मर्जीतील अधिकाऱ्यांना आणले जात आहे.
- जयप्रकाश छाजेड, अध्यक्ष, महाराष्ट्र एसटी वर्कर्स कॉंग्रेस (इंटक)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com