निवृत्त पोलिस अधिकारी पुन्हा पोलिसांच्या जाळ्यात

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 23 एप्रिल 2017

मुंबई - सावत्र मुलाच्या हत्येप्रकरणी अटक आरोपी निवृत्त सहायक पोलिस आयुक्त शिवाजी किसन नरवणे याला पुन्हा अटक करण्यात कुलाबा पोलिसांना अखेर यश आले. सत्र न्यायालयात महिनाभरापूर्वी तारखेला हजर केल्यानंतर पोलिसांना चकवून नरवणे पळाला होता. नेहरूनगर परिसरातून त्याला अटक केल्याचे सूत्रांनी सांगितले.

तत्कालीन सहायक पोलिस आयुक्त नरवणे याने 2013 मध्ये रोहन झोडगे (वय 25) याची हत्या केली होती. रोहन हा टिळकनगर परिसरात आई नंदा, लहान भाऊ आणि बहिणीसह राहत होता. नंदाने पहिल्या पतीपासून फारकत घेतली होती. 2009 मध्ये तिने नरवणे याच्याशी विवाह केला होता. या विवाहाला रोहनचा विरोध होता. त्यावरून तो आईला सतत त्रास देत असे. चेंबूरमधील घर आपल्या नावावर करावे, असा तगादाही त्याने लावला होता. त्यामुळेच रोहनची आई, नंदा व नरवणे यांनी त्याच्या हत्येचा कट रचल्याचे बोलले जात आहे. नरवणे याने चाकूचे रोहनची हत्या केली. टिळकनगर पोलिसांनी त्याला अटक केली होती. त्या वेळी तारखेला नेले असताना 23 मार्चला नरवणे सत्र न्यायालयातूनच पळून गेला होता. महिनाभरापासून कुलाबा पोलिस त्याच्या मागावर होते.

Web Title: retired police officer arrested by police