25 वर्ष विना अपघात सेवा देणार्‍या चालकांना मिळणार बक्षीस, परिवहन मंत्र्यांची घोषणा

25 वर्ष विना अपघात सेवा देणार्‍या चालकांना मिळणार बक्षीस, परिवहन मंत्र्यांची घोषणा

मुंबई: एसटी महामंडळात 25 वर्षे विना अपघात सेवा देणाऱ्या चालकांना यापुढे 25 हजार रुपये बक्षीस देऊन गौरविण्यात येईल, अशी घोषणा परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष अॅड. अनिल परब यांनी केली.  चुकलेल्या चालकांना ज्याप्रमाणे आपण शिक्षा करतो. त्याचप्रमाणे चांगले काम करणाऱ्याचेही आपण कौतुक करायला पाहिजे, असेही मत मंत्री परब यांनी एसटी महामंडळाच्या सुरक्षितता मोहीम उदघाटना प्रसंगी आपली मत व्यक्त केले.

सुरक्षित प्रवास हेच प्रमुख ध्येय असलेल्या एसटी महामंडळाने 18 जानेवारी ते 17 फेब्रुवारी दरम्यान रस्ते सुरक्षितता मोहीम राबवली जाणार आहे. या मोहिमेचे उद्घाटन सोमवारी परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष अॅड. अनिल परब यांच्या हस्ते मुंबई सेंट्रल आगार येथे  पार पडले. या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण एसटी महामंडळाची 31 विभागीय कार्यालये आणि 250 आगारात करण्यात आले होते.  यावेळी एसटी महामंडळात गेली 25 वर्षाहून अधिक काळ विना अपघात सेवा देणारे भारत कोल्हे, कीर्ती कुमार पाटील, परशुराम बंडेकर, सुदेश समुद्रे, महादेव जगधने या मुंबई विभागातील  5 चालकांचा परिवहन मंत्री अॅड. परब यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि स्मृती चिन्ह देऊन प्रातिनिधिक स्वरूपात गौरव करण्यात आला.

विना अपघात गाडी चालविणाऱ्याचा मला अभिमान आहे. एसटीचे चालक हे उत्तम प्रशिक्षित चालक असतात. अशी कौतुकाची थाप देतानाच  राज्यातील प्रत्येक आगारात असे अनेक चालक आहेत, ज्या चालकांनी 25 वर्ष विना अपघात सेवा दिली आहे. त्यांना यापुढे 25 हजार रुपये  रोख बक्षीस देऊन गौरविण्यात येईल  असे परिवहन मंत्र्यांनी जाहीर केले. तसेच अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी एसटी महामंडळाच्या स्तरावर  जे प्रयत्न केले  जातात, त्या प्रयत्नांना यश लाभो आणि लोकांमध्ये सुरक्षिततेची भावना वाढीस लागो अशी आशा मंत्री परब यांनी व्यक्त केली. याबरोबरच, रस्ते सुरक्षितता अभियान हा कार्यक्रम केवळ आठवडाभरासाठी, 15 दिवसासाठी किंवा महिनाभरासाठी न राबवता, मोहीम वर्षभर असायला हवी अशी अपेक्षाही त्यांनी बोलून दाखवली.

-------------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

Rewards given drivers provide 25 years accident free service Anil Parab announcement

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com