रियाकडून तपासाला सहकार्य नाही; EDच्या चौकशीनंतर समोर आली माहिती

reha chakravarthi
reha chakravarthi

मुंबई - सुशांत सिंग राजपूत प्रकऱणी रिया चक्रवर्ती तिच्या भावासोबत जबाब नोंदवण्यासाठी सक्तवसुली संचालनालयाच्या कार्यालयात पोहोचली होती. दरम्यान, आता अशी माहिती समोर येत आहे की रियाकडून तपासामध्ये सहकार्य केलं जात नाही. अधिकाऱ्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे नीट देत नसून अनेकदा आपल्याला आठवत नसल्याचं तिचं म्हणणं आहे. रिया चक्रवर्तीकडे गेल्या 5 वर्षांच्या इन्कम टॅक्स रिटर्नची कागदपत्रे दाखवण्याची मागणी करण्यात आली आहे. 

रिया आणि तिचा भाऊ शौविक चक्रवर्ती सकाळी ईडीच्या कार्यालयात पोहोचले होते. त्यानंतर दोन तासांनी शौविक चक्रवर्ती कार्यालयातून बाहेर पडला आणि पुन्हा कार्यालयात आला होता. ईडीच्या अधिकाऱ्यांनी शौविककडे काही कागदपत्रांची मागणी केली आहे. ती कागदपत्रे आणण्यासाठीच शौविक गेला होता अशी माहिती मिळते. 

रिपोर्टनुसार, ईडी रियाची तीन टप्प्यात चौकशी करणार आहे. यासाठी तिच्याकडून कोणती माहिती हवी आहे आणि सुशांतच्या प्रकरणी तिला कोणते प्रश्न विचारायचे याची यादीही तयार आहे. ईडीने सुशांतची माजी बिझनेस मॅनेजर श्रुती मोदीलासुद्धा हजर होण्यास सांगितलं होतं. तीसुद्धा कार्यालयात पोहोचली होती. सुशांतसोबत फ्लॅटमध्ये राहणाऱ्या सिद्धार्थ पिठानीला देखील 8 ऑगस्टला बोलावण्यात आलं आहे. 

याआधी रिया चक्रवर्तीच्या वकीलांनी मुदत वाढवून द्यावी अशी मागणी केली होती. मात्र ईडीने त्यांच्या या मागणीला दाद दिली नाही. रिया चक्रवर्ती ईडीसमोर आली नसती तर तिच्यावर गुन्हा दाखल केला जाऊ शकत होता त्यामुळे तिला हजर रहावं लागलं.

सुशांत सिंग राजपूतचे वडील केके सिंग यांनी एफआयरमध्ये पैशांचा गैरव्यवहार झाल्याचा आरोपही केला आहे. रिया चक्रवर्तीचं 2018-19 चे उत्पन्न जवळपास 14 लाख रुपये इतकं असताना तिच्या 2 मोठ्या मालमत्ता असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे रियावर संशय असून मनी लाँड्रिंगच्या दृष्टीने चौकशी केली जात आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com