esakal | सुशांतच्या बहिणींची तक्रार रद्द करण्याची याचिका रद्द करावी, रियाने सादर केलं प्रतिज्ञापत्र
sakal

बोलून बातमी शोधा

सुशांतच्या बहिणींची तक्रार रद्द करण्याची याचिका रद्द करावी, रियाने सादर केलं प्रतिज्ञापत्र

सुशांतला बोगस प्रिस्क्रिप्शनद्वारे प्रतिबंधित औषधे दिल्याचा आरोप रियाने राजपूत बहिणींवर केला आहे.

सुशांतच्या बहिणींची तक्रार रद्द करण्याची याचिका रद्द करावी, रियाने सादर केलं प्रतिज्ञापत्र

sakal_logo
By
सुनीता महामुणकर

मुंबई, ता. 27 : अभिनेता सुशांतसिंह राजपूत प्रकरणात त्याच्या बहिणींनी दाखल केलेली याचिका फेटाळण्याची मागणी सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीने आज प्रतिज्ञापत्राद्वारे मुंबई उच्च न्यायालयात केली.

सुशांतला बोगस प्रिस्क्रिप्शनद्वारे प्रतिबंधित औषधे दिल्याचा आरोप रियाने राजपूत बहिणींवर केला आहे. याबाबत तिने वांद्रे पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. ही तक्रार रद्द करण्यासाठी प्रियंका आणि मितू सिंह यांनी उच्च न्यायालयात याचिका केली आहे. यामध्ये आज रियाच्या वतीने ऍडव्होकेट सतीश मानेशिंदे यांनी प्रतिज्ञापत्र दाखल केले. सध्या तपास प्राथमिक टप्प्यात आहे आणि पोलिसांना तपासाला अवधी मिळायला हवा, असेही रियाने प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. 

महत्त्वाची बातमी : करिश्मा प्रकाशच्या घरात सापडलेत ड्रग्स, NCB कडून करिश्माला पुन्हा समन्स

रियाने केलेली फिर्याद रद्द करण्याची मागणी दोन्ही बहिणींनी केली आहे. आकसाने आणि जाणीवपूर्वक या प्रकरणात आम्हाला अडकविण्यासाठी हा आरोप असून दिल्लीच्या डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार ही औषधे आहेत, जर डॉक्टरांनी प्रिस्क्रिप्शन दिले असेल तर त्यामध्ये चूक काय आहे, असा दावा याचिकेत केला आहे.

सध्या सीबीआय या प्रकरणात तपास करीत आहे. सुशांतने आत्महत्या केल्याचा अहवाल एम्सच्या वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला आहे. तसेच सुशांत अमंलीपदार्थ घेत असे तपासामध्ये उघड झाले आहे. रियाला उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.

महत्त्वाची बातमी : मुंबईतून कोरोनाची साथ गेली ? रुग्णदुपटीचा कालावधी 139 दिवसांवर

( संपादन - सुमित बागुल )

rhea files affidavit to dismiss petition filed by sushant singh rajputs sisters