नोटाबंदीत पश्‍चिम रेल्वे मालामाल

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 17 डिसेंबर 2016

फुकट्या प्रवाशांकडून आठ कोटी 78 लाखांचा महसूल
मुंबई - आर्थिक व्यवहारातून 500 व हजारच्या नोटा रद्द करण्याच्या निर्णयाचा फटका सर्वच सरकारी यंत्रणांना बसला. याउलट पश्‍चिम रेल्वेच्या तिकीट निरीक्षकांना नोव्हेंबर हा चांगलाच कमाईचा ठरला आहे. प्रवाशांच्या खिशात सुट्या पैशांची टंचाई असतानाही तिकीट निरीक्षकांनी पश्‍चिम रेल्वेला आठ कोटी 78 लाखांचा महसूल मिळवून दिला.

नोटाबंदीच्या निर्णयानंतर रेल्वेतून फुकट प्रवास करणाऱ्यांची चंगळ झाली होती. तिकीट निरीक्षकांना बंदी घातलेल्या नोटा दाखवत ताठ मानेने ऐटीत चालणारे फुकटे जागोजागी मिळाले. पश्‍चिम रेल्वेचे तिकीट निरीक्षक मात्र या फुकट्यांवर भारी पडले. नोव्हेंबरमध्ये फुकट्या प्रवाशांबरोबर अवैध तिकीट, जादा सामान याची एक लाख 98 हजार प्रकरणे दाखल झाली. त्यातून आठ लाख 78 हजारांचा महसूल रेल्वेला मिळाला आहे. गेल्या वर्षातील नोव्हेंबरमधील कारवाईची तुलना करता हा आकडा 29.20 टक्‍क्‍यांनी कमी आहे. नोटाबंदीची पार्श्‍वभूमी लक्षात घेता तो निश्‍चितच जास्त आहे. या काळात अवैधरीत्या आरक्षित तिकीट हस्तांतरित करण्याची 73 प्रकरणे पकडली,

लांबपल्ल्याच्या गाड्यांत कारवाई तीव्र
लांबपल्ल्याच्या गाड्यांमधील तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्यांविरोधात कारवाई तीव्र केली आहे. त्यातील 216 व्यक्‍तींना ताब्यात घेऊन रेल्वे कायद्यानुसार कारवाई केली. याशिवाय महिलांच्या डब्यात प्रवास करणाऱ्या 12 वर्षांवरील 155 मुलांना पकडण्यात आले. त्यांना योग्य ती समज देऊन सोडून देण्यात आले.

Web Title: rich Western Railway by currency ban