यामुळे रायगडमधील रिक्षाचालक संतापले

यामुळे रायगडमधील रिक्षाचालक संतापले

पेण : रायगड जिल्ह्यातील विक्रम मिनीडोर चालक-मालकांच्या प्रलंबित मागण्यांवर विचारविनमय करण्यासाठी चालक-मालक संघाचे महाअधिवेशन पुढील महिन्यात अलिबाग येथे घेण्यात येणार आहे. यामध्ये हजारो रिक्षा चालक-मालक सहभागी होणार आहेत. 

विक्रम मिनीडोर चालक-मालक संघाच्या पदाधिकाऱ्यांनी राज्याचे परिवहन आयुक्त शेखर चेनी यांची भेट घेतली. त्या वेळी त्यांच्या प्रलंबित मागण्यांविषयी चर्चा केली. या वेळी परिवहन उपायुक्त सहस्रबुद्धे, संघाचे जिल्हाध्यक्ष विजय पाटील, प्रमोद पाटील, आदेश मोरे, जिल्हा प्रतिनिधी दीपक म्हात्रे, विक्रम मिनीडोर संघाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. आयुक्तांबरोबर प्रलंबित मागण्यांसदर्भात चर्चा झाली. 

संघाचे महाअधिवेशन पुढील महिन्यात अलिबाग येथे होणार आहे. या वेळी मागण्यांसादर्भात आढावा घेण्यात येणार आहे, असे विजय पाटील यांनी सांगितले. रायगड जिल्ह्यातील अतिदुर्गम ते विकसनशील भागातील खराब रस्ते असूनही रिक्षाचालक अत्यंत माफक दरांत प्रवासी सेवा देत आहेत. अधिक चांगल्या सुविधा देण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्था आणि परिवहन विभागाकडे पाठपुरावा सुरू आहे, असेही त्यांनी सांगितले.

अलिबाग येथे होणाऱ्या अधिवेशनात संघातील गुणवंत, प्रामाणिक आणि सामाजिक कार्यात वेगळा ठसा उमटविणाऱ्या सदस्यांना गौरविण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com