अश्‍लील चाळे करणाऱ्या रिक्षाचालकाला अटक 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 11 सप्टेंबर 2019

चिंचोली बंदर येथे रात्रीच्या वेळी एक तरुणी बससाठी थांबली असताना हा रिक्षाचालक तेथे आला.

अंधेरी : रस्त्यात तरुणीसमोर अश्‍लील चाळे करणाऱ्या रिक्षाचालकाला पोलिसांनी मालाड येथून अटक केली आहे. गुन्हे शाखेच्या युनिट 11 मधील पोलिसांनी ही कारवाई केली. 
चिंचोली बंदर येथे रात्रीच्या वेळी एक तरुणी बससाठी थांबली असताना हा रिक्षाचालक तेथे आला.

त्याने रिक्षात बसून हस्तमैथुन सुरू केले. या तरुणीने रिक्षाचे छायाचित्र घेण्याचा प्रयत्न केला असता, तो पळून गेला. त्यानंतर तिने पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी सीसी टीव्ही चित्रणाच्या आधारे आरोपी रिक्षाचालकाला शोधून काढले. पोलिस चौकशीत त्याने गुन्हा कबूल केला; त्यानंतर त्याला अटक करण्यात आली. आरोपीच्या विरोधात यापूर्वी हाणामारी आणि विनयभंगाचे गुन्हे दाखल आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rickshaw driver arrested for committing pornography