मनमानी भाडेवसुली रिक्षाचालकाला भोवली

Rickshaw
Rickshaw

मुंबई - मीटरप्रमाणे भाडे न आकारणे एका रिक्षाचालकाला चांगलेच महागात पडले. तब्बल नऊपट भाडे घेतल्याची तक्रार प्रवाशांनी ट्विटरवरून केल्यावर पोलिसांनी या रिक्षाचालकाला अवघ्या तासाभरात पकडून दंड वसूल केला.

विमानतळ रोड मेट्रो स्थानकापासून विमानतळ टर्मिनस-2 पर्यंत रिक्षाने जाण्यासाठी 18 रुपये भाडे होते. परंतु, या अवघ्या दीड किलोमीटरच्या अंतरासाठी रिक्षाचालक प्रवाशांकडून 50 ते 60 रुपये घेतात. शुक्रवारी (ता. 31) सकाळी रिक्षाचालकाने एका प्रवाशाकडून या अंतरासाठी 300 रुपये मागितले. प्रवाशाने तक्रार करण्याची भीती दाखवल्यावर त्याने 100 रुपयांवर तडजोड केली. हे भाडेही जास्त असल्यामुळे या प्रवाशाने रिक्षाच्या नंबरप्लेटचे छायाचित्र मुंबई पोलिसांच्या ट्विटर हॅंडलवर शेअर करत तक्रार नोंदवली. या तक्रारीची दखल घेत वाहतूक पोलिसांनी अवघ्या 55 मिनिटांत या रिक्षाचालकावर कारवाई करून दंड वसूल केला.

मुंबईत अनेक ठिकाणी रिक्षाचालक मनमानी पद्धतीने प्रवाशांकडून भाडे वसुली करतात. वांद्रे स्थानकापासून वांद्रे-कुर्ला संकुलापर्यंत जाताना असा अनुभव नेहमी येतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com