रिक्षाचालकांचा 9 जुलैला राज्यव्यापी संप 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 10 जून 2019

भाडेवाढ, निवृत्तिवेतन, भविष्यनिर्वाह निधी आदी मागण्या 30 जूनपर्यंत मान्य न झाल्यास 9 जुलैला राज्यातील रिक्षाचालक  संप पुकारतील, असा इशारा ऑटो रिक्षा चालक-मालक संघटनेच्या नेतृत्वाखालील संयुक्त कृती समितीने रविवारी दिली.

मुंबई - भाडेवाढ, निवृत्तिवेतन, भविष्यनिर्वाह निधी आदी मागण्या 30 जूनपर्यंत मान्य न झाल्यास 9 जुलैला राज्यातील रिक्षाचालक  संप पुकारतील, असा इशारा ऑटो रिक्षा चालक-मालक संघटनेच्या नेतृत्वाखालील संयुक्त कृती समितीने रविवारी दिली. समितीने मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्री आणि परिवहन मंत्र्यांनाही दिले आहे. 

भाडेवाढ आणि अन्य प्रलंबित मागण्यांच्या मुद्द्यावर आगामी भूमिका ठरवण्यासाठी रविवारी गोरेगाव येथे समितीची बैठक झाली. त्यात हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती समितीचे अध्यक्ष शशांक राव यांनी दिली. 

समितीच्या मागण्या 
- रिक्षा चालक-मालकांसाठी राज्य सरकारने स्थापन केलेले कल्याणकारी महामंडळ परिवहन विभागांर्तगत असावे. 
- विमा कंपनीत भरले जाणारे पैसे कल्याणकारी महामंडळात भरावेत. त्याद्वारे रिक्षाचालक-मालकांना निवृत्तिवेतन, ग्रॅच्युईटी, भविष्य 
निर्वाह निधी, वैद्यकीय मदत देण्यात यावी. 
- बेकायदा प्रवासी वाहतूक राखण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात विशेष भरारी पथक असावे. 
- हकीम कमिटीच्या शिफारशीनुसार रिक्षाचे भाडे तातडीने वाढविण्यात यावे. 
- ओला-उबेरसारख्या खासगी कंपन्याची टॅक्‍सी सेवा त्वरित बंद करण्यात 
यावी. 
- रिक्षांच्या विमा हप्त्यांमध्ये होत असलेली भरमसाट वाढ रोखावी. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rickshaw drivers are statewide strike on July 9

टॅग्स