शासनाने मंजूर करून दिलेल्याप्रमाणेच रिक्षा भाडे घ्यावे - संजय ससाणे 

रविंद्र खरात 
गुरुवार, 21 फेब्रुवारी 2019

कल्याण - रिक्षा भाडे दरवाढी बाबत प्रस्ताव शासन दरबारी असून त्याचा निर्णय होईपर्यंत या पूर्वी शासनाने मंजूर करून दिलेल्या रिक्षा भाडे दरवाढीनुसार रिक्षा चालकांनी प्रवाश्याकडून रिक्षा भाडे घ्यावे, मंजूर रिक्षा भाडे पेक्षा जास्त भाडे घेणाऱ्याच्या विरोधात कठोर कारवाई सुरू केल्याची माहिती कल्याण आरटीओ उप प्रादेशिक परिवहन अधिकारी संजय ससाणे यांनी सकाळला दिली.

कल्याण डोंबिवली शहरात वाढणाऱ्या रिक्षाची संख्या यामुळे होणारी वाहतूक कोंडीमुळे नागरीक त्रस्त असताना दुसरी कडे रिक्षा चालक ज्यादा रिक्षा भाडे घेत असल्याच्या तक्रारी 24 आल्या होत्या त्या धर्तीवर कल्याण आरटीओ उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय ससाणे यांनी विशेष पथकाची नेमणूक करून धडक कारवाईचे आदेश दिले होते. या कारवाई मध्ये 40 रिक्षा जप्त केल्या यात विविध प्रकरणात 24 रिक्षा चालकांचे लायसन्स आणि परमिट निलंबित केली असून ही कारवाई पुढे सुरू ठेवणार असल्याची माहिती ससाणे यांनी यावेळी दिली.

रिक्षा संघटनांनाच्या मागणी नुसार नवीन भाडे वाढ बाबत प्रस्ताव शासन दरबारी पाठविले असून तो पर्यंत रिक्षा चालक आणि प्रवासी यांच्यामध्ये वाद होणार नाही यासाठी रिक्षा संघटना पदाधिकारी यांनी पुढाकार घ्यावा अश्या सूचना दिल्याची माहिती यावेळी ससाणे यांनी दिली तर शासनाने यापूर्वी रिक्षा भाडे वाढ दर मंजूर केले होते त्यानुसार भाडे दरवाढ घ्यावी त्यापेक्षा जास्त घेणाऱ्या रिक्षा चालकांची तक्रारी आल्यास त्यांच्या वर कठोर कारवाई करण्यासाठी विशेष पथकाची निर्मिती केल्याची माहिती यावेळी कल्याण आरटीओ उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय ससाणे यावेळी सकाळला दिली.

Web Title: Rickshaw rent should be charged as approved by the government - Sanjay Sasane