रिक्षा संघटनेचे आंदोलन पोलिसांनी काढले मोडीत 

kalyan.jpg
kalyan.jpg

कल्याण  : रिक्षा चालक मालकांच्या विविध मागण्यांसाठी ऑटो रिक्षा चालक मालक संघटना संयुक्त कृती समिती (महाराष्ट्र राज्य) वतीने आज (ता. 27) नोव्हेंबरला कल्याणमध्ये रिक्षा बंदचे आवाहन केले होते.  आवाहन करून ही रिक्षा बंद होत नाही म्हणून कृती समितीच्या पदाधिकाऱ्यानी रिक्षा बंद करण्यास सुरवात केल्यामुळे अनेक ठिकाणी शुकशुकाट होता. मात्र रिक्षा टॅक्सी महासंघाच्या पदाधिकारींनी त्याला विरोध करत आमने-सामने आले. मात्र , पोलिसांनी दोन्ही गटाला पांगावले त्यामुळे पुन्हा रिक्षा सुरू झाल्याने नागरीकांना दिलासा मिळाला.

रिक्षा चालकांच्या विविध मागण्यासाठी ऑटो रिक्षा चालक मालक संघटना संयुक्त कृती समिती (महाराष्ट्र्र राज्य) यांच्यावतीने रिक्षा चालक आणि मालक यांच्या विविध मागण्यासाठी आज  (ता. 27) नोव्हेंबरला कल्याण बंदचे आवाहन केले होते. त्याला सकाळी 6 ते 9 या कालावधीत काहीसा प्रतिसाद मिळाला. मात्र, अकरा ते बाराच्या सुमारास पुन्हा रिक्षा सुरू झाल्याने कृती समितीच्या पदाधिकारी यांनी दीपक हॉटेल समोरील उल्हासनगरला जाणाऱ्या रिक्षा बंद करण्यास सुरवात केली. अनेकांनी रिक्षा बंद ही केल्या. यावेळी तेथील रिक्षा टॅक्सी महासंघाच्या पदाधिकाऱ्यानी तेथे येऊन रिक्षा बंद करण्यास विरोध केला. त्यामुळे दोन संघटना आमने-सामने आल्याने परिसरात तणाव निर्माण झाला. मात्र,  पोलिसांनी दोन्ही गटाला पांगवत रिक्षा सुरू केल्याने नागरीकांना दिलासा मिळाला .

आंदोलकांना नोटीस 
रिक्षा बंद करण्याचा इशारा देणाऱ्या कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांना महात्मा फुले पोलिसांनी नोटिसा बजावल्या होत्या. आजही पोलिसांनी आक्रमक भूमिका घेतल्याने कल्याण स्टेशन परिसरात दुर्घटना घडली नाही. दरम्यान पोलिसांच्या आक्रमक भूमिकेमुळे रिक्षा चालक मालक संघटना संयुक्त कृती समिती ( महाराष्ट्र्र राज्य ) पदाधिकारी राहुल कांबळे, शिवाजी गोरे, ज्ञानेश्वर सोनावणे, सुनील थळे, मुकेश भदोरीया, विभवसिंह भदोरीया, एलान बर्मावाला, राजू केणे, आदीच्या शिष्टमंडळाने वाहतूक शाखा वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोविंद गंभीरे आणि आरटीओ अधिकारी यांना निवेदन देऊन आपल्या आंदोलनाची सांगता केली .

कल्याण डोंबिवली मधील मागण्या
- कल्याण आरटीओ कार्यालय मधील दलालाचा वावर, सावळा गोंधळ,भष्टाचार थांबविणे. 
- वार्डन आणि वाहतूक पोलीस मार्फत रिक्षा चालकांचा मानसिक छळ केला जातो तो थांबविणे 
- पदाधिकारी वर्गाने हस्तक्षेप केल्यास गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली जाते ते थांबविणे. 
-  कल्याण डोंबिवली मधील अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई करावी.
- कल्याणकारी मंडळ जाहीर करा, रिक्षा इन्शुरन्स वाढ कमी करा ,आदी मागण्याचा समावेश आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com