कल्याणमध्ये विविध मागण्यासाठी आरटीओ कार्यालयावर रिक्षा मोर्चा 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 27 जून 2018

कल्याण : ऑटो रिक्षा चालक मालक संयुक्त कृती समिती महाराष्ट्र मंगळवार (ता 26 ) राज्यव्यापी आंदोलनाला पाठींबा देत कल्याण मधील विविध रिक्षा संघटनेने कल्याण मधील डॉ बाबासाहेब आंबेडकर उद्यान ते कल्याण आरटीओ कार्यालय रिक्षा मोर्चा काढत आपला निषेध व्यक्त केला.

कल्याण : ऑटो रिक्षा चालक मालक संयुक्त कृती समिती महाराष्ट्र मंगळवार (ता 26 ) राज्यव्यापी आंदोलनाला पाठींबा देत कल्याण मधील विविध रिक्षा संघटनेने कल्याण मधील डॉ बाबासाहेब आंबेडकर उद्यान ते कल्याण आरटीओ कार्यालय रिक्षा मोर्चा काढत आपला निषेध व्यक्त केला.

रिक्षा चालक मालकांच्या विविध मागण्यांसाठी ऑटो रिक्षा चालक मालक संयुक्त कृती समिती महाराष्ट्र आज ( ता. 26 )  राज्यव्यापी आंदोलनाची घोषणा केली होती त्याला आज  कल्याण मधील अनेक रिक्षा संघटनाने पाठींबा दिला होता. कल्याण मधील महाराष्ट्र रिक्षा चालक मालक सेनाचे गोपाळ नवगिरे, टॅक्सी संघटनेचे बबलू आतिशखान, रिपब्लिकन रिक्षा चालक मालक युनियन अध्यक्ष राहुल दामले, महाराष्ट्र रिक्षा पंचायत ठाणे जिल्हा अध्यक्ष शिवाजी गोरे, लाल बावटा रिक्षा युनियन अध्यक्ष फुलकान डोलारे, राष्ट्रवादी संघटना अध्यक्ष ज्ञानेश्वर सोनावणे, सुनील थळे, विलास भाटे, रवि कोतवाल, मच्छिन्द्र राठोड, रामा काकडे आदी रिक्षा संघटना पदाधिकाऱ्यांनी आज मंगळवार (ता 26 जून) दुपारी 12 च्या सुमारास कल्याण पश्चिम मधील आंबेडकर उद्यान मध्ये घोषणा बाजी करत भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार घातला. तद्नंतर रिक्षा मोर्चास सुरुवात केली.

कल्याण पश्चिम आंबेडकर उद्यान ते मुरबाड रोड , बिर्ला कॉलेज रोड मार्गे आरटीओ कार्यालयावर धडक मोर्चा काढत आपला निषेध व्यक्त केला. यावेळी काही काळ वाहतूक कोंडी झाली तर जागोजागी कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवला होता. तद्नंतर रिक्षा संघटना पदाधिकाऱ्यानी सहायक उपप्रादेशिक अधिकारी आय एच मासुमदार यांची भेट घेत निवेदन दिले यावेळी आपल्या मागण्या वरिष्ठ पातळीवर पाठविण्यात येणार असल्याची माहिती मासुमदार यांनी देताच रिक्षा संघटनांनी आपले आंदोलन मागे घेतले.

 

 

Web Title: riksha morcha at rto office oin kalyan