रिंकुबाबाचा हवेत गोळीबार

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 15 नोव्हेंबर 2019

गुरुनानक जयंतीच्या दिवशी उल्हासनगरमध्ये दोन भव्य फेऱ्या निघाल्या होत्या. त्यापैकी एका फेरीचे आयोजक रिंकुबाबा यांनी फेरीमध्ये चक्क वायबार (हवेत गोळीबार) केल्याची घटना समोर आली आहे.

उल्हासनगर : गुरुनानक जयंतीच्या दिवशी उल्हासनगरमध्ये दोन भव्य फेऱ्या निघाल्या होत्या. त्यापैकी एका फेरीचे आयोजक रिंकुबाबा यांनी फेरीमध्ये चक्क वायबार (हवेत गोळीबार) केल्याची घटना समोर आली आहे. ध्वनिप्रदूषणावर काम करणाऱ्या हिराली फाऊंडेशनच्या सर्वेसर्वा सरिता खानचंदानी यांनी याबाबत पोलिसांत तक्रार केली अाहे. 
मंगळवारी (ता.१२) गुरुनानक यांची ५५० वी जयंती होती.

यानिमित्त उल्हासनगर येथे थायरासिंग दरबाराचे टिल्लू सिंग, जसकीरत सिंग यांच्या आणि अमृतवेल ट्रस्टच्या वतीने अशा दोन भव्य फेऱ्या काढल्या होत्या. त्याचवेळी अमृतवेल ट्रस्टच्या वतीने गोल मैदान येथून फेरी निघाली. ही फेरी कॅम्प नंबर ३ ओटी सेक्‍शनमधील शाळेजवळ पोहचली असताना रिंकुबाबा यांनी बंदूकीतून हवेत वायबार केले. हा व्हिडीओ उशिराने समाजमाध्यमात प्रसारीत झाला. हा व्हिडीओ सरिता खानचंदानी यांनी पोलिसांना ट्विट करून रिंकुबाबा यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
 

‘रिंकुबाबा उल्हासनगरचे ब्रँड ॲम्बेसेडर’
स्वच्छ भारत अभियानअंतर्गत तत्कालीन आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांनी रिंकुबाबा यांना उल्हासनगरचे ब्रँड एंबेसेडर केलेले आहे. मात्र, हवेत फायरिंग केल्याने सरिता खानचंदानी यांनी पुढाकार घेत तक्रार केल्याने बाबा अडचणीत येण्याची शक्‍यता आहे.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rinkuba fires in the air