महागाई मुळे रिक्षा टॅक्सी चालकांवर परिणाम

रविंद्र खरात
बुधवार, 22 ऑगस्ट 2018

कल्याण : सध्याची महागाई त्यात रिक्षा टॅक्सी सुट्टे साहित्य महाग आणि परिवहन शुल्कात वाढ यामुळे टॅक्सी, रिक्षा चालकांना व्यवसाय करणे मुश्किल झाले असून मागील 4 वर्षापासून भाडे वाढ दिले नाही ते त्वरित द्यावे अशी मागणी रिक्षा टॅक्सी महासंघ कोकण विभाग अध्यक्ष प्रकाश पेणकर यांनी राज्याचे परिवहन आयुक्त यांच्याकडे केली आहे . 

शासनाने टॅक्सी आणि ऑटो रिक्षा यांचे भाडेसुत्र ठरविणे यासाठी हकीम समितीची नेमणूक केली होती , हकीम समितीने महागाई निर्देशांकानुसार दरवर्षी मे महिन्यात भाडेवाढ देण्याची शिफारस केली आहे, तर शासनाने त्रिसदस्यीय खटुआ समिती नेमली होती. त्यांनीही भाडे दर वाढ करण्याबाबत सकारात्मक आहे. मागील 4 वर्षात इंधन दरवाढ, रिक्षा आणि टॅक्सीचे सुट्टे साहित्य महाग त्यामुळे त्याचा फटका रिक्षा टॅक्सी चालकांवर झाला आहे .राज्यात सरकारी आणि खासगी कंपनी कर्मचारी वर्गाला महागाई भत्ता, आरोग्य फ़ंड, आदी सुविधा आहेत मात्र रिक्षा चालकांना काय सुविधा आहे ? एकीकडे महागाई वाढली असताना परिवहन शुल्कात वाढ झाल्याने रिक्षा आणि टॅक्सी चालकांचे कंबरडे मोडले असून शेतकरी प्रमाणे रिक्षा चालकांनी आत्महत्या केल्यावर राज्य शासन जागे होणार काय ? असा सवाल केला जात आहे .

कल्याण आरटीओ अंतर्गत येणाऱ्या शहरात एक ही रिक्षा मीटरने धावत नाही मात्र भाडे दरवाढ सूत्र मीटर ने लावले आहे . दीड किलोमीटर पहिले टेरिफ 18 रुपये असून ते 22 रुपये तर पुढील अंतर 12 रुपये असून ते 16 रुपये करावे म्हणजे आगामी भाडे वाढ 8 रुपयांनी वाढवून रिक्षा संघटनाची असून राज्य शासन आणि परिवहन विभाग या मागणीला काय उत्तर देते याकडे लक्ष्य लागले आहे .

Web Title: Rise in taxi drivers due to inflation