हृदयविकाराचा धोका आहे? मिठाचे सेवन कमी करा 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 16 जानेवारी 2019

मुंबई - हृदय हा शरीरातील सर्वांत महत्त्वाचा अवयव आहे. आजची धावपळीची जीवनशैली, तणाव आणि फास्टफूड खाण्याच्या सवयींमुळे हृदयावर गंभीर परिणाम होतो. त्यामुळे हृदयाघात, हृदयक्रिया बंद पडणे, हार्ट फेल्युअर यांसारखे हृदयाचे आजार होतात. 

मुंबई - हृदय हा शरीरातील सर्वांत महत्त्वाचा अवयव आहे. आजची धावपळीची जीवनशैली, तणाव आणि फास्टफूड खाण्याच्या सवयींमुळे हृदयावर गंभीर परिणाम होतो. त्यामुळे हृदयाघात, हृदयक्रिया बंद पडणे, हार्ट फेल्युअर यांसारखे हृदयाचे आजार होतात. 

हार्ट फेल्युअर हा सर्वांत दुर्लक्षित व वेळेवर निदान न होणारा हृदयविकार आहे. यामध्ये हृदयातील स्नायू कमकुवत होऊन हृदयाचे कार्य योग्यपणे होत नाही. या संदर्भात झालेल्या संशोधनात, हृदयविकाराला इतर कारणांसह अधिक प्रमाणातील मिठाचे सेवन कारणीभूत असल्याचे समोर आले आहे. मिठातील सोडियमचे प्रमाण शरीरासाठी घातक आहे. हार्ट फेल्युअरच्या रुग्णांमध्ये सोडियमचे प्रमाण जास्त आढळून आले आहे. परिणामत: हात, पाय, पायाच्या घोट्यावर सूज येते. कमी मीठ असलेला आहार उच्च रक्‍तदाब आणि सूज यांवर नियंत्रण ठेवण्यास मदत करतो. मिठाच्या पाकिटावरील माहिती बघून त्यात क्षाराचे प्रमाण तपासल्यास, मिठाच्या सेवनावर नियंत्रण ठेवता येते. सामान्यत: दिवसातून तीन वेळा जेवण करणाऱ्या व्यक्‍तींच्या प्रत्येक वेळी जेवणात 500 ते 1000 मिलीग्रॅम मिठाचे सेवन पुरेसे आहे. 

मिठाशिवाय जेवण अशक्‍य नसले, तरीही स्वयंपाकात कमी प्रमाण मीठ टाकल्यास फायदा होऊ शकतो. पदार्थांची चव कायम ठेवण्यासाठी मसाले किंवा औषधी वनस्पतींचा वापर करता येतो. भाज्या, फळे, दही यांसारख्या पर्यायांमुळे मिठाचे सेवन कमी करण्यास मदत होऊ शकते. - डॉ. देवकिशन पहालाजानी, इंटरवेन्शल कार्डियोलॉजिस्ट, 
ब्रीज कॅन्डी हॉस्पिटल, मुंबई 

Web Title: risk of heart attack Reduce the intake of salt

टॅग्स