रितेश-जेनेलियाकडून पुरग्रस्तांना मदत

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 12 ऑगस्ट 2019

राज्यभरातून येथील पुरग्रस्तांसाठी आर्थिक, कपडे, वस्तू स्वरूपात मदत करण्यात येत आहे. मदतीचा ओघ सुरु असताना अभिनेता रितेश देशमुख व जेनेलिया देशमुख यांनी मुख्यमंत्री सहायता निधीस 25 लाखांचा धनादेश दिला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तो मदतीचा धनादेश स्वीकारला.

मुंबई : कोल्हापूर, सांगलीतील पुरग्रस्तांसाठी राज्यभरातून मदतीचे हात पुढे असून, अभिनेता रितेश देशमुख व जेनेलिया देशमुख यांनी मुख्यमंत्री सहायत निधीस 25 लाख रुपयांची मदत दिली आहे.

गेल्या आठ दिवसांपासून कोल्हापूर आणि सांगलीला पुराने वेढले आहे. पाण्यात अडकलेल्या हजारो नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे. तर, काहींना आपला जीवही गमवावा लागला होता. आता पुराचे पाणी ओसरण्यास सुरवात झाली असून, मदतकार्याला वेग आला आहे.

राज्यभरातून येथील पुरग्रस्तांसाठी आर्थिक, कपडे, वस्तू स्वरूपात मदत करण्यात येत आहे. मदतीचा ओघ सुरु असताना अभिनेता रितेश देशमुख व जेनेलिया देशमुख यांनी मुख्यमंत्री सहायता निधीस 25 लाखांचा धनादेश दिला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तो मदतीचा धनादेश स्वीकारला.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ritesh Deshmukh and Jenelia help to flood affected peoples in Kolhapur Sangli