नदी पुनरुज्जीवन प्रकल्प आराखड्यास मुख्यमंत्र्यांची तत्त्वतः मंजुरी

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 9 ऑगस्ट 2018

मुंबई - राज्यातील नद्यांचे पुनरुज्जीवन व संवर्धन होणे आवश्‍यक आहे. त्यासाठी रॅली फॉर रिव्हर अंतर्गत यवतमाळ जिल्ह्यातील वाघारी नदीचे पुनरुज्जीवन प्रकल्प देशासाठी पथदर्शी ठरणार आहे, असे प्रतिपादन राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी आज येथे केले. या वेळी वाघारी नदी पुनरुज्जीवन प्रकल्पाच्या आराखड्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्त्वतः मंजुरी दिली.

ईशा फाउंडेशनच्या वतीने नद्यांच्या पुनरुज्जीवनासाठी रॅली फॉर रिव्हर हा प्रकल्प राबविण्यात येत असून, त्याअंतर्गत यवतमाळ जिल्ह्यातील वाघारी नदीचे पुनरुज्जीवन करण्यात येणार आहे. या प्रकल्पाच्या आराखड्याचे सादरीकरण आज राज्यपाल विद्यासागर राव व मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत करण्यात आले. राज्यपाल म्हणाले, की वाघारी नदीचे पुनरुज्जीवन केल्यामुळे आसपासच्या शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्याबरोबरच पर्यावरण संवर्धनही होणार आहे. त्यामुळे हा फक्त एका जिल्ह्यासाठी नसून संपूर्ण देशासाठी महत्त्वपूर्ण प्रकल्प आहे. वाघारी नदी पुनरुज्जीवन आराखड्यास तत्त्वतः मंजुरी देऊन मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, की या प्रकल्पासाठी आराखड्यानुसार विशेष उद्देश वहन (एसपीव्ही) कंपनीची स्थापना करण्यात येईल. त्यानुसार पुढील कार्यवाही करण्यात येईल.

Web Title: River Revival Project plan permission