'गेली गेली मुंबई खड्ड्यात...'

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 17 जुलै 2018

मुंबई : मुंबई तुझा माझ्यावर भरोसा नाय काय हे गाणे आरजे मलिष्का म्हटले आणि राजकारणात खळबळ माजली. या गाण्यानंतर आरजे मलिष्काने पुन्हा एकदा नव्या गाण्याच्या माध्यमातून मुंबई महानगरपालिका आणि सरकारच्या कारभारावर बोट ठेवलं आहे. यावेळी मलिष्काने 'सैराट' सिनेमातील 'झिंगाट..' गाण्याचा आधार घेतला आहे. मलिष्काने सोशल मीडियावर हे गाणं लाईव्ह करत बीएमसी आणि सरकारवर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे.

मुंबईत गेल्या काही दिवसांपासून सलग पाऊस पडत आहे. ठिकठिकाणचे रस्ते पाण्य़ाखाली गेले होते. काही दुरुस्त केलेल्या रस्त्यांवर खड्डे पडले. या सगळ्याला उद्देशून मलिष्काने हे नवे गाणे प्रसिद्ध केले असून, सोशल मीडियावर व्हॉयरल झाले आहे. नेटिझन्सनी मुंबई महानगर पालिकवर टीका करू लागले आहेत. मलिष्काने या गाण्यातून अप्रत्यक्षरित्या मुंबई महापालिका, सरकारवर टीका केली आहे. या गाण्यातून मलिष्कानं गेली मुंबई पाण्याखाली आणि खड्ड्यात रस्ते की रस्त्यात खड्डे असे म्हटले आहे.

सैराट चित्रपटातील 'झिंग झिंग झिंगाट..' गाण्याच्या चालीवर मलिष्कानं 'गेली गेली मुंबई खड्ड्यात..' हे गाणं तयार केले असून, ते चर्चेत आले आहे.

Web Title: rj malishkas new song on mumbai potholes