रस्त्यांची दुरुस्ती धीमीच! आठवडाभरात कामे पूर्ण करण्याचा निर्णय

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 4 जून 2018

अशी आहे रस्ते दुरुस्ती... 
संपूर्ण रस्ते दुरुस्ती ः 612 रस्ते, 36 जंक्‍शन 
पावसाळ्यापूर्वी : 282 रस्ते, 29 जंक्‍शन 
पावसाळ्यानंतर : 330 रस्ते, 7 जंक्‍शन 

मुंबई : मॉन्सून पाच-सहा दिवसांत मुंबईत दाखल होण्याची शक्‍यता आहे. मात्र शहरातील रस्ते दुरुस्ती अद्याप धीम्या गतीने सुरू आहे. पावसाची चाहूल लागल्यामुळे महापालिकने आठवडाभरात दुरुस्ती पूर्ण करण्याचा निर्णय घेतला आहे. 

रस्ते दुरुस्तीसाठी 31 मेपर्यंतची मुदत देण्यात आली होती. त्यानंतरही अनेक रस्त्यांची दुरुस्ती सुरूच आहे. तसेच काम पूर्ण झाल्यानंतरही अनेक रस्त्यांच्या परिसरात राडारोडा पडून होता. याबाबत पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी सर्व उपायुक्तांची रविवारची सुट्टी रद्द करून त्यांना रस्ते सुस्थितीत करून घेण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार रविवारी सर्व उपायुक्त आणि सहाय्यक आयुक्तांनी रस्त्यावर फिरून राडारोडा हटवून घेतला; मात्र तरीही अनेक रस्त्यांच्या दुरुस्तीची कामे सुरूच आहेत. 

शिवडी, लालबाग, रे रोड, चारकोप, अंधेरी परिसरासह अनेक रस्त्यांच्या दुरुस्तीची कामे अपूर्ण आहेत. अंधेरी लोखंडवाला येथील एक रस्ता दुरुस्त केल्यानंतर तेथे पुन्हा चर खोदण्यात आले आहेत. पावसाच्या तोंडावर उर्वरित कामे पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत, असे स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी सांगितले. 

अशी आहे रस्ते दुरुस्ती... 
संपूर्ण रस्ते दुरुस्ती ः 612 रस्ते, 36 जंक्‍शन 
पावसाळ्यापूर्वी : 282 रस्ते, 29 जंक्‍शन 
पावसाळ्यानंतर : 330 रस्ते, 7 जंक्‍शन 

Web Title: Road repair slow! Decision is complete the work in a week

टॅग्स