रस्ता सुरक्षा अभियान एक आठवडा नव्हे वर्षभर राबविणार  - दिपक बांदेकर 

रविंद्र खरात 
सोमवार, 11 फेब्रुवारी 2019

कल्याण - रस्ता सुरक्षा अभियान एक आठवडा नव्हे वर्षभर राबविण्यात येणार असल्याची माहिती वाहतूक शाखेचे सहायक पोलिस आयुक्त दिपक बांदेकर यांनी दिली. 

कल्याण - रस्ता सुरक्षा अभियान एक आठवडा नव्हे वर्षभर राबविण्यात येणार असल्याची माहिती वाहतूक शाखेचे सहायक पोलिस आयुक्त दिपक बांदेकर यांनी दिली. 

30 वा राष्ट्रीय रस्ते सुरक्षा अभियान सोमवार ता 4 फेब्रुवारी ते रविवार 10 फेब्रुवारी या कालावधीत कल्याण पूर्व - पश्चिम वाहतूक पोलिसांच्या विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. यावर्षी केवळ जनजागृती न करता आगळे वेगळे कार्यक्रम वाहतूक पोलिसांच्या वतीने आयोजित करण्यात आले होते. याबाबत माहिती देताना वाहतूक शाखेचे सहायक पोलिस आयुक्त दिपक बांदेकर यांनी सांगितले की रस्ता सुरक्षा अभियान एक आठवडा नव्हे वर्षे भर राबविण्यात येणार आहे. यावर्षी जनजागृती सोबत वाहतूक पोलीस कर्मचारी अधिकारी वर्गासाठी, रिक्षा चालक आणि अन्य वाहकासाठी कल्याण पूर्व आणि पश्चिममध्ये आरोग्य शिबिराचे आयोजन केले होते, यासोबत पी यु सी तपासणी व मोफत पी.यु.सी. वाटपाच्या कार्यक्रम आयोजन करत वाहन चालकांना हवा प्रदूषण, निसर्ग काळजी, आणि वाहतुकीचे नियम पालनाचे महत्व ही आम्ही सांगितले हे काम वर्षे भरात सामाजिक संघटना, शिक्षक, आणि विद्यार्थी मार्फत नागरिकांमध्ये प्रबोधन करण्यात येणार असल्याची माहिती बांदेकर यांनी सांगितले.

Web Title: Road safety campaign will be implemented in a week not more - Deepak Bandekar