कल्याण पूर्वमध्ये रस्ता रुंदीकरण ठरताहेत नागरीकांसाठी अन्यायकारक!

कल्याण पूर्वमध्ये रस्ता रुंदीकरण ठरताहेत नागरीकांसाठी अन्यायकारक!

कल्याण : कल्याण पूर्व मधील काटेमानवली नाका ते गणपती चौक व्हाया म्हसोबा चौक ते तिसगाव नाका 'यु टाइप' रस्ता 80 फूट रुंदीकरण करणे नागरिकांवर अन्यायकारक असून त्याऐवजी तो 60 फूट रुंदीकरण करून रस्ता बनवा, अशी मागणी शिवसेना जेष्ठ नगरसेवक रमेश जाधव यांनी पालिका आयुक्त गोविंद बोडके यांच्याकडे केली आहे. 

कल्याण पूर्व भागात गेल्या अनेक वर्षांपासून नगरसेवक, नागरिक यांच्या विकासाच्या नावाखाली रस्ता रुंदीकरण व्हावे ही मागणी आहे. त्यासोबत आरक्षणे, बगीचा, भाजी मार्केट, वाहनतळ, मुतारी, शौचालय, क्रीडांगण, तसेच संपूर्ण भागात जोड रस्ते, नाले बनवा अश्या मागण्या होऊन या कामांना गती न मिळाल्याने कल्याण पूर्वचा विकास खुंटला असून अगोदर या कामांना गती द्या, अशी मागणी नगरसेवक रमेश जाधव यांनी केली आहे.

कल्याण पूर्वमध्ये अनधिकृत चाळी,  इमारती धनदांडग्यानी उभ्या केल्या, भूमाफियांनी चाळी, इमारती विकून स्वतः गब्बर झाले. मात्र सामान्य नागरिकांना वेठीस धरून आज विकास करू पाहत आहेत, असा आरोप नगरसेवक रमेश जाधव यांनी केला आहे. बांधकाम करण्यास कल्याण पूर्व मध्ये जागा शिल्लक नसल्यामुळे मोठमोठ्या बिल्डर्सचा डोळा आता जुन्या चाळी, इमारतीवर लागला असून आता कल्याण पूर्वचा विकास व्हावा यासाठी काही मंडळी ओरड करत असल्याची टीका नगरसेवक रमेश जाधव यांनी केली आहे.

रमेश जाधव हे महापौर पदी असताना कल्याण पूर्व मध्ये काटेमानवली, वालधुनी उड्डाणपूल, पाणी पुरवठा, मलनिस्सारण वाहिनी, खडगोळवली नाल्या खाली पुश थ्रू बोगदासाठी निधी आणला होता. त्यावेळचे आयुक्त रामनाथ सोनावणे, गोविंद राठोड, यांनी कल्याण पूर्वसाठी अंदाजपत्रकात तरतुद करून मलंगरोड ते खडेगोळवली 100 फुटी रस्ता तसेच सूचक नाका ते श्रीराम टॉकीज हा सिमेंटचा रस्ता बनविणे काम सुरू केल तर, कल्याण पूर्वमधील अंतर्गत डीपी रस्ते तयार करावेत व तद्नंतर कल्याण पूर्व 'यु टाइप' रस्ता करावा अशी मागणी होती. जेणेकरून नागरिकांना सुविधा मिळाव्यात असे असताना कल्याण पूर्व मधील 'यु टाइप' रस्ता 80 फूट करणे अन्यायकारक असून महासभेने पाठविलेले केलेल्या पुर्नवसन धोरणाची कुठलेही अंमलबजावणी झाली नसताना तेथील नागरिक, व्यापारी, दुकानदार, हे भयभीत झाले असून 80 फूट रस्ता म्हणजे तेथील स्थानिक नागरिकांचे नुकसान जास्त होते. पालिकेची आर्थिक परिस्थिती पाहता 80 फूट ऐवजी 60 फूट रस्ता रुंदीकरण करून रस्ता बनवा जेणेकरून कल्याण पूर्व विकास सोबत सर्व सामान्य नागरिकांना दिलासा मिळेल. ,असा दावा नगरसेवक रमेश जाधव यांनी केला असून आयुक्त गोविंद बोडके काय निर्णय घेतात याकडे लक्ष्य लागले आहे .

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com