खड्डेदुरुस्ती महागात ; कंत्राटदारावर गुन्हा दाखल

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 27 ऑगस्ट 2018

नवी मुंबई : शीव-पनवेल महामार्गावर पडलेले खड्डे दुरुस्त करणे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कंत्राटदाराला महागात पडले आहे. विनापरवानगी वाहतूक वळवून खड्डेदुरुस्ती केल्याप्रकरणी नवी मुंबई पोलिसांनी स्वामी समर्थ कंत्राटदार कंपनीवर गुन्हा दाखल केला आहे. सीबीडी-बेलापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून अशा प्रकारचा हा राज्यातील पहिलाच गुन्हा ठरणार आहे. 

गेले दोन दिवस पावसाच्या विश्रांतीमुळे भरदिवसाच शीव-पनवेल महामार्गावर सीबीडी-उड्डाणपुलावर चढण्याच्या जागेवर पडलेले खड्डे दुरुस्त करण्याचे काम स्वामी समर्थ कंत्राटदार कंपनीने हाती घेतले होते. या कामामुळे मुंबईच्या दिशेला जाणाऱ्या मार्गावर सीबीडी-बेलापूर उड्डाणपुलापासून ते खारघरपर्यंतच्या दोन किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा गेल्या होत्या. या खड्डेदुरुस्तीसाठी संबंधित कंत्राटदाराने वाहतूक विभागाची पूर्व परवानगी न घेता वाहतूक मार्गिकेत बदल केला होता. याला जबाबदार धरत नवी मुंबई पोलिसांनी कलम 431 अन्वये कंत्राटदार गणेश परदेशी यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. 

गेल्या दोन महिन्यांपासून शीव-पनवेल महामार्गावर पडलेले खड्डे व वाहतूक कोंडीची देशभर कुप्रसिद्धी झाली आहे. खड्ड्यांमुळे होणाऱ्या वाहतूककोंडीमुळे पुण्याहून मुंबईला जाणारे चाकरमानी पुरते हैराण झाले आहेत. खड्ड्यांमध्ये तोल जाऊन सानपाड्याजवळ दुचाकीस्वाराने जीवही गमावला आहे. शीव-पनवेल महामार्गावर पडलेल्या खड्ड्यांची वारंवार दुरुस्ती करण्यात येत आहे. त्यामुळे वाहतूक कोंडीत आणखीनच भर पडत आहे. वाहतूक पोलिस व सार्वजनिक बांधकाम विभागाला एकत्र होऊनच रस्तेदुरुस्तीचे काम करावे लागत आहे. 

Web Title: Roads repairs Filed a complaints on contractor