आरक्षित तिकीटाचा बहाण्याने प्रवाशाची लूटमार करणाऱ्याला अटक

रविंद्र खरात 
शनिवार, 10 ऑगस्ट 2019

कल्याण : मेल गाड्यांचे आरक्षित रेल्वे तिकीट काढण्याचा बहाना करत रेल्वे प्रवाशाची लूटमार करणाऱ्या टोळीतील एकाला अटक करण्यात कल्याण रेल्वे पोलिसांना अटक करण्यात यश आले असून अन्य आरोपींचा शोध कल्याण रेल्वे पोलीस करत आहे . 

कल्याण : मेल गाड्यांचे आरक्षित रेल्वे तिकीट काढण्याचा बहाना करत रेल्वे प्रवाशाची लूटमार करणाऱ्या टोळीतील एकाला अटक करण्यात कल्याण रेल्वे पोलिसांना अटक करण्यात यश आले असून अन्य आरोपींचा शोध कल्याण रेल्वे पोलीस करत आहे . 

मध्य रेल्वेचे कल्याण रेल्वे स्थानक महत्वाचे स्थानक आहे . येथून लोकल सोबत मेल गाड्या ही धावतात. उत्तर भारतात जाणाऱ्या प्रवाश्यांची जास्त गर्दी असते. आरक्षित तिकीट मिळाल्याने कल्याण रेल्वे स्थानक मध्ये येऊन अनेक जण साधी तिकीट काढुन मेल गाड्यां मध्ये प्रवास करतात . तिकीट घरामध्ये रांगेत एखादा प्रवासी असेल त्याच्याशी गप्पा मारायच्या त्याला आरक्षित तिकीट काढुन देतो असा बहाना करत त्याला बाहेर आणून लूटमार करणारी टोळी सक्रिय होती. 30 जुलैला उत्तरप्रदेश कडे जाणारा लालसाहब सुरेश गौतम यांची फसवणूक करून त्याची लूटमार झाली होती .याप्रकरणी कल्याण रेल्वे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होताच, पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अजित बारटक्के यांनी सहायक पोलिस उपनिरीक्षक अशोक होळकर यांच्या समवेत, अरविंद निवळे आदीचे विशेष पथक नेमूणक करून तपास सुरू झाला होता.

या पथकाला गुन्हा उघड करण्यास यश आले असून दुर्गाप्रसाद प्रजापती या गुन्हेगाराला अटक करण्यात आली आहे. या टोळीतील 2 जणांचा शोध सुरू असून प्रवाश्यांनी रेल्वेचे आरक्षित तिकीट काढताना काळजी घ्यावी असे आवाहन कल्याण रेल्वे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित बारटक्के यांनी केले आहे .


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: a robber arrestes who robbed people with reservation tickets excuse