माथेरानमध्ये हेरिटेज कपाडिया मार्केटचे छप्‍पर वार्!याने उडाले

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 1 नोव्हेंबर 2019

माथेरान (बातमीदार) : माथेरानमध्ये बुधवारी (ता. ३०) रात्री सोसाट्याचा वारा सुटला होता. यात हेरिटेज असलेल्या कपाडिया मार्केटमधील ब्रिटीशकालीन मटण मार्केटचे छप्पर पडले. रात्रीची वेळ असल्याने मोठी जीवितहानी टळली.

माथेरान (बातमीदार) : माथेरानमध्ये बुधवारी (ता. ३०) रात्री सोसाट्याचा वारा सुटला होता. यात हेरिटेज असलेल्या कपाडिया मार्केटमधील ब्रिटीशकालीन मटण मार्केटचे छप्पर पडले. रात्रीची वेळ असल्याने मोठी जीवितहानी टळली.

माथेरानमधील गोरगरीब नागरिकांना आधारवड असलेल्या ब्रिटिशकालीन कपाडिया मार्केटमध्ये वेगवेगळ्या मार्केटची विभागणी केली आहे. यामध्ये भाजी मंडई, मच्छी मार्केट, मटण मार्केट यांचा समावेश आहे. १९१९ मध्ये या कपाडिया मार्केटची निर्मिती करण्यात आली होती. १०० वर्षे उलटूनही हे मार्केट स्थानिकांसह पर्यटकांना भुरळ घालत होते. लाल दगडाच्या भिंती, पत्र्याची उतरती छपरे, समसमान गाळे हे या मार्केटची वैशिष्ट्ये आहेत. त्यामध्येच मटण मार्केटचा वेगळा समावेश करण्यात आला आहे. याच मटण मार्केटचे लोखंडी छप्पर ३० तारखेच्या रात्री सोसाट्याच्या वाऱ्यामुळे कोसळले. लोखंडी खांब गंजल्यामुळे ते ठिसूळ झाले होते. याबाबत मटण मार्केटमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी याअगोदर नगरपालिकेत मार्केटची पुनर्निर्मिती करावी, असा विनंती अर्ज दाखल केला होता. त्या अनुषंगाने नगरपालिकेने हे हेरिटेज मार्केटचे काम करण्यास सुरुवात केली. 

या मार्केटचा एक भाग कोसळल्यामुळे काही मटण दुकाने बंद केली आहेत. या मार्केटची पुनर्निर्मिती लवकरात लवकर करावी, अशी मागणी मटण व्यापारी करत आहेत.

या मार्केटमध्ये माझा वडिलोपार्जित मटणाचा धंदा आहे. हे मार्केट खूप जुने असल्याने येथील लोखंड जीर्ण झाले होते. याबाबत आम्ही नगरपालिकेत याची दुरुस्ती करावी, असा अर्ज नगरपालिकेत केला. हे काम सुरू झाले आहे; पण ते संथगतीने सुरू असून लवकरात लवकर पूर्ण करावे.
- नितीन खांगटे, मटण व्यावसायिक


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The Roof blew of heritage kapadia Market in Matheran