अकरावी प्रवेशासाठी पुन्हा फेरी 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 21 ऑगस्ट 2018

मुंबई  - अकरावी प्रवेशाची विशेष फेरी राबविल्यानंतरही नऊ हजार नऊ विद्यार्थी प्रवेशापासून वंचित आहेत. या विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी केंद्रीय प्रवेश प्रक्रिया समितीने प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्त्वानुसार प्रवेश फेरी राबविण्याचे निश्‍चित केले आहे. 

मुंबई  - अकरावी प्रवेशाची विशेष फेरी राबविल्यानंतरही नऊ हजार नऊ विद्यार्थी प्रवेशापासून वंचित आहेत. या विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी केंद्रीय प्रवेश प्रक्रिया समितीने प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्त्वानुसार प्रवेश फेरी राबविण्याचे निश्‍चित केले आहे. 

यासाठी विद्यार्थ्यांचे तीन गटांत विभाजन करण्यात आले आहे. 80 ते 100 टक्के गुण असणारे विद्यार्थी गट क्रमांक एकमध्ये, 60 ते 100 टक्के गुण असणारे गट क्रमांक दोनमध्ये आणि तिसऱ्या गटात 35 टक्के ते त्यापुढील विद्यार्थ्यांचा समावेश आहे. या प्रवेशाची प्रक्रिया 25 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर या कालावधीत राबविण्यात येणार आहे. प्रवेश निश्‍चित न केलेल्या विद्यार्थ्यांनाही या प्रक्रियेत सामावले जाणार आहे. 

महाविद्यालयातील रिक्त जागांचा तपशील संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे. गट क्रमांक 1 मधील विद्यार्थ्यांनी 25 ऑगस्ट रोजी संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या महाविद्यालयांच्या रिक्त जागांची माहिती घेऊन पसंतीक्रम भरायचा आहे. 

फेरीचे वेळापत्रक 
- 25 ऑगस्ट : रिक्त जागांचा तपशील संकेतस्थळावर. 
- 27 ऑगस्ट : गट क्रमांक 1 चा ऑनलाईन प्रवेश निश्‍चित होणार. 
- 27 आणि 28 ऑगस्ट : (सकाळी 11 ते 3) विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात जाऊन प्रवेश निश्‍चित करणे. 
- 28 ऑगस्ट : सायंकाळी 6 वाजता रिक्त जागांचा तपशील संकेतस्थळावर प्रसिद्ध. 
- 29 ऑगस्ट : गट क्रमांक 2 मधील ऑनलाईन प्रवेश निश्‍चित होईल. 
- 29, 30 ऑगस्टपर्यंत : (सकाळी 10 ते 3) विद्यार्थ्यांना महाविद्यालयात प्रवेश घ्यावा लागणार. 
- 30 ऑगस्ट : सायंकाळी 6 वाजता रिक्त जागांचा तपशील संकेतस्थळावर. 
- 31 ऑगस्ट : गट क्रमांक 3 मधील विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्‍चित. 
- 31 ऑगस्ट : (सकाळी 10 ते 3) आणि 1 सप्टेंबरपर्यंत विद्यार्थ्यांना महाविद्यालयात प्रवेश घ्यावा लागेल. 
- 2 सप्टेंबर : सकाळी 11 वाजता फेरी 2 साठी रिक्त जागांचा तपशील संकेतस्थळावर. 

Web Title: Round about for the eleventh entrance