रिपाइं आठवले गटाला मुंबईत 25 जागा हव्यात 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 16 जानेवारी 2017

मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीत रिपाइं आठवले गटाला भाजपबरोबर युती करून 25 जागा हव्या आहेत. याचबरोबर उपमहापौर रिपाइंचाच झाला पाहिजे, असे रिपाइं नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी म्हटले आहे. 

राज्यातील दहा महानगरपालिकांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. मुंबईत यापूर्वी रिपाइं आठवले गटाने भाजपबरोबर आघाडी केली होती. विधानसभा निवडणुकीतही भाजपसोबत रिपाइं होता. त्यामुळे भाजपने आमच्याशी युती करून मुंबईत किमान 25 जागा आमच्या उमेदवारांसाठी सोडाव्यात, असे आठवले यांचे मत आहे. जरी युती नाही झाली तरी 60 च्या आसपास जागा लढविणार आहोत. मुंबईत ताकद आहे. या ताकदीचा विचार करून भाजपवाले जागा सोडतील, अशी अपेक्षा आहे, असेही आठवले म्हणाले.

मुंबईत उपमहापौरपद रिपाइंला मिळावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्‍त केली आहे. भाजपबरोबरच्या महायुतीतील इतर घटक पक्ष राष्ट्रीय समाज पक्ष, शिवसंग्राम संघटना हेदेखील मुंबई महापालिका निवडणूक लढविण्याच्या विचारात आहेत, असे समजते. 
 
Web Title: rpi athawale faction wants 25 seats in mumbai