रिपब्लिकन पक्षाचा बुधवारी मोर्चा

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 28 एप्रिल 2018

मुंबई - मागासवर्गीयांच्या विविध प्रश्‍नांसाठी रिपब्लिकन पक्षातर्फे बुधवारी (ता. 2 मे) राज्यभरातील जिल्हाधिकारी कार्यालयांवर मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती "रिपाइं'चे राष्ट्रीय अध्यक्ष, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिली. कोरेगाव भीमा हिंसाचाराची प्रत्यक्ष साक्षीदार असलेल्या पूजा सुरेश सकट हिची हत्याच झाली आहे. मारेकऱ्यांवर खुनाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. कोरेगाव भीमा दंगलप्रकरणी झालेल्या महाराष्ट्र बंदमधील आंदोलकांवरील खटले काढून घेण्यात यावेत, अशी मागणीही त्यांनी केली. ऍट्रॉसिटी कायद्याला धक्का लागता कामा नये. ऍट्रॉसिटी कायद्यात कोणताही बदल न करता या कायद्याचे संरक्षण झालेच पाहिजे, असेही त्यांचे म्हणणे आहे.
Web Title: RPI rally