Raigad Building Collapse: मृतांच्या कुटूंबियांना 5 लाख रुपये मदतीची घोषणा; 13 जणांचे मृतदेह NDRF च्या जवानांच्या हाती

सुनिल पाटकर
Tuesday, 25 August 2020

शहरातील तारीक गार्डन या इमारतीच्या दुर्घटनेनंतर या ठिकाणी शोध कार्याला वेग आला असून आत्तापर्यंत तेरा जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात एनडीआरएफच्या जवानांना यश आले आहे

महाड - शहरातील तारीक गार्डन या इमारतीच्या दुर्घटनेनंतर या ठिकाणी शोध कार्याला वेग आला असून आत्तापर्यंत तेरा जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात एनडीआरएफच्या जवानांना यश आले आहे तर चार वर्षाचा एक मुलगा गुखरूप जिवंत काढण्यात आला आहे. दरम्यान या घटनेप्रकरणी  महाराष्ट्र पोलीस ठाण्यामध्ये  पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Raigad Building Collapse: 10 वर्षे जुनी इमारत पत्त्यासारखी कशी कोसळली?, पाच जणांवर गुन्हा दाखल

महाड शहरातील काजळपूरा भागामध्ये असलेली तारीक गार्डन ही इमारत 2००9 साली बांधलेली होती .निकृष्ट बांधकामामुळे काल सायंकाळी सहा वाजता ही इमारत अचानक कोसळली. या इमारतीमध्ये 45 सदनिका असून इमारत कोसळली त्यावेळी 86 जण इमारतीमध्ये होते. परंतु इमारत कोसळत असल्याचे लक्षात येतात अनेक जण बाहेर पडले या धावपळीमध्ये बारा जण किरकोळ जखमी झाले आहेत प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार 20 जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. दरम्यान काल रात्री पासूनच या ठिकाणी मदत कार्याला वेग आला आहे श्वानपथक ही मदतीला दाखल झाले आहे. ची टीम दहा पोकलेन व जेसीपी 25 हून अधिक डंपर तसेच सामाजिक संस्था व कार्यकर्ते या ठिकाणी मदत कार्य करत आहेत अनेक डंपर भरून द्वारे काढले जात आहेत.

दरम्यान. या दुर्घटना प्रकरणी तारीक गार्डन इमारतीचे विकासक फारुक महामुदमिया काझी (प्रोप्रा. कोहिनूर डेव्हलपर्स तळोजा नवी मुंबई ), वास्तूविशारद गौरव शहा ( व्हर्टीकल आर्कीटेक्ट ॲंन्ड कन्सल्टंसी नवी मुंबई ), आर सी सी डिझायनर्स बाहुबली टी धावणे ( श्रावणी कंन्सल्टन्सी मुंबई ) , महाड न. प. चे तत्कालीन कनिष्ठ पर्यवेक्षक शशिकांत दिघे , आणि तत्कालीन न प मुख्याधिकारी दिपक झुंजाड यांच्यावर महाड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

इमारतीला परवानगी

या इमारतींची बांधकाम परवानगी नगरपरिषदेने  ११/५/२०११ रोजी दिलेली असून इमारत पुर्ण झाल्यानंतर इमारतींचा भोगवटा १९/१०/२०१३ रोजी देण्यात आल्याची माहिती मुख्याधिकारी जीवन पाटील यांनी दिली. भोगवटा प्रमाणपत्रावर तत्कालीन मुख्याधिकारी दिपक झिंजाड यांची स्वाक्षरी असल्याचे तर शशिकांत दिघे हे बांधकाम पर्यवेक्षक म्हणून नगरपरिषदेत कार्यरत होते असेही मुख्याधिकारी पाटील यांनी स्पष्ठ केले 

तब्बल १९ तासानंतर चिमुकल्या मोहम्मदला NDRF ने काढलं ढिगाऱ्याबाहेर आणि सर्वांनी म्हटलं गणपती बाप्पा मोरया

निकृष्ट बांधकामाचा नमुना 
तारीक गार्डन इमारतीचे बांधकाम अत्यंत निकृष्ट दर्जाचे असल्याच्या तक्रारी रहिवासी संबधीत बिल्डरकडे करीत होते , मात्र नगरपरिषदेत तक्रारी करु नका मी दुरुस्ती करुन देतो अशी बोलवण या बिल्डरकडून केली जात होती , अशी माहिती या इमारतीमधील रहिवाशांनी दुर्घटनेनंतर दिली . दुर्घटना घडल्याच्या दिवशी सकाळी इमारतीच्या पार्कींगमधील एक पिलर ढासळल्याची तक्रार या इमारतीच्या रहिवाशांनी या बिल्डरच्या निदर्शनास आणून दिले , मात्र मी प्लास्टर करुन देतो, अशी रहिवाशांची समजूत काढून त्यांची पुन्हा बोळवण केली , आणि त्यानंतर केवळ सात आठ तासातच ही इमारत पुर्ण कोसळून ही दुर्घटना घडली .

मृतांची नावे 
- नाविद झमाने (३५) -नौसीम नदीम बांगी (३५) -आदी शेखनाग (१४) - मतीन मुकादम (१७) - फातीमा शौकत अलसुरकर  (६०) - रोशनबिबी दाऊदखान देशमुख (७५), - इसमत हसीम शेखनाग (३५) - फातीमा शरीफ अन्सारी (४३) - अल्तमश मेहबुब बल्लारी (२६) - शौकत आदम अलसुरकर (६३) - आयेशा नदीम बांगी (७) - रुकैया नदीम बांगी (२) 

जखमींमध्ये नामिरा शौकत मसुरकर वय १९, फरीदा रियाज पोरे, नवीद हमीद दुस्ते ३२, महमद बांगी वय ८ हे जखमी झाले आहेत. तर मदत करणारे शेजारील स्वप्नील प्रमोद शिर्के वय २४ जयप्रकाश कुमार, संतोष सहानी, दीपक कुमार हे बचाव कार्यातील जवान देखील जखमी झाले आहेत.

( ही माहिती मंगळवार सायंकाळी 7 वाजेपर्यंतची आहे )

 

दुर्घटनेतील  मृतांच्या वारसांना पाच लाखाची मदत : वडेट्टीवार यांची घोषणा 
 

तारीक गार्डन इमारत दुर्घटनेत मरण पावलेल्या प्रत्येक मृतांच्या वारसांना पाच लाख रुपयांची  शासकिय मदत देण्याची घोषणा मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी आज महाडमध्ये केली . या दुर्घटनेत या इमारतीतील कुटुंबीयांनी आपले सर्वस्व गमावले आहे, याउप्परही या कुटुंबाना मदत आणखी आर्थिक मदत करण्याबाबत उद्याच्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेतला जाईल असेही सुतोवाच ना वडेट्टीवार यांनी यावेळी केले.

-------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rs 5 lakh assistance announced to the families of the deceased; The bodies of 13 people were found by NDRF personnel