माहिती अधिकारात सरपंचाने स्वतःच्या कारकिर्दिचीच मागविली माहिती

संजीत वायंगणकर
गुरुवार, 16 ऑगस्ट 2018

स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून बुधवारी 15 ऑगस्ट रोजी खोणी ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांतर्फे जिल्हा परिषद शाळेत ध्वजारोहण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्या कार्याक्रमच्या अध्यक्षीय भाषणात ठोंबरे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर ग्रामपंचात पदाधिकार तसेच पंचायत समिती सदस्य किरण ठोंबरे उपस्थित होते.

डोंबिवली- भ्रष्टाचार व पारदर्शक विकास यातील फरक ग्रामस्थांना दाखविण्यासाठी माहिती अधिकारात स्वतःच्या कारकिर्दिची माहिती मागविली असून लवकरच जनता दरबारात सर्वांसमोर मांडणार असल्याची घोषणा करणारा एक सरपंच स्वातंत्र्यदिनी ग्रामस्थांनी पाहिला.

केंद्रापासून गावपातळीवर भ्रष्टाचाराचा स्पर्श होऊ नये यासाठी भाजपा शासन कटिबद्ध असल्याच्या अनेक बातम्या समोर असल्यातरी डोंबिवली जवळील खोणी गावाचे सरपंच हनुमान ठोंबरे यांनी पारदर्शकता जनते समोर आणण्ययासाठी थेट स्वतःच्या कामाबाबतच माहिती अ धिकाराचा आधार घेतला आहे, विशेष म्हणजे त्यांनी त्यांच्या सरपंचपदाच्या कारकिर्दीत किती कामे झाली याची संपूर्ण कुंडली माहितीच्या अधिकारात मागून घेतानाच यापूर्वीही ग्रामपंचायतीच्या कारभारात भ्रष्टाचार झाला का? याचीही माहिती मागितली आहे. खोणी गावात भ्रष्टाचार होऊ देणार नसून गावाचा विकास करण्यावर संपूर्ण लक्ष केंद्रित करणार अशी स्पष्ट कबुली ग्रामस्थांसमोर भाजपाचे विद्यमान सरपंच हनुमान ठोंबरे यांनी दिली.

स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून बुधवारी 15 ऑगस्ट रोजी खोणी ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांतर्फे जिल्हा परिषद शाळेत ध्वजारोहण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्या कार्याक्रमच्या अध्यक्षीय भाषणात ठोंबरे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर ग्रामपंचात पदाधिकार तसेच पंचायत समिती सदस्य किरण ठोंबरे उपस्थित होते.

खोणी ग्रुप-ग्रामपंचायत आर्थिक दृष्टीने सुदृढ असून स्वतःच्या निधीवर विकास कामे होत आहेत. खासदार-आमदार यांचा निधी या गावासाठी खर्ची झाला नाही. पूर्वी खासदारांनी गाव दत्तक घेतल्याचे जाहीर केले. मात्र ते रद्द करुन खासदारांनी दुसरेच गांव दत्तक घेतले. त्यामुळे, खोणी ग्रामपंचायतीला ठाणे जिल्ह्यात आदर्श करण्यासाठी सर्व ग्रामस्थांनी सहकार्य केले पाहिजे, असे सरपंच हनुमान ठोंबरे यांनी यावेळी सांगितले.

दरम्यान, शाळेतील माजी विद्यार्थांचा उच्च शिक्षण पूर्ण  केल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. शाळेतील शिक्षकवृंदानी विद्यार्थ्यांवर विशेष लक्ष देऊन विद्यार्थांकडून सादर करण्यात आलेली भाषणे अतिशय लक्षवेधी ठरली.

Web Title: in RTI sarpanch request his own information