आरटीओ आणि रिक्षा संघटनांचा 'नो हॉर्न पिल्ज' उपक्रम

रविंद्र खरात 
शनिवार, 7 एप्रिल 2018

कल्याण - कल्याण डोंबिवली सहित अनेक शहरात वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहेत. अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी होत असून, त्या दरम्यान वाहनांच्या हॉर्नच्या आवाजाने होणाऱ्या प्रदूषणमुळे वाहन चालकासहित नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. यावर कल्याण आरटीओ आणि कल्याण मधील विविध रिक्षा संघटना तसेच मुंबई रिक्षामेन्स युनियन यांच्या संयुक्त विद्यमाने 'नो हॉर्न पिल्ज'चा अभिनव उपक्रम हाती घेतला असून, आज शनिवार ता 7 एप्रिल 2018 रोजी कल्याण आरटीओ कार्यालय परिसरात राज्याचे विधी व न्याय विभाग सचिव राजेंद्र भागवत यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले.

यावेळी 'नो हॉर्न पिल्ज' उपक्रमाची माहिती आरटीओ अधिकारी संजय ससाणे यांनी दिली. तसेच राजेंद्र भागवत यांनी उपक्रमाचे कौतुक करत हॉर्नमुळे होणाऱ्या प्रदूषण रोखण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन केले. यावेळी अनेक रिक्षाच्या पाठीमागे 'नो हॉर्न पिल्ज'चे स्टिकर लावण्यात आले. तर एका रिक्षा 150 हुन अधिक हॉर्नने सजवली असून, त्या माध्यमातून 'नो हॉर्न पिल्ज'ची जनजागृती करत असल्याचे यावेळी सांगण्यात आले. राजेंद्र भागवत यांनी कल्याण आरटीओ कार्यालय मार्फत वाहन चालकांना आणि नागरीकांना देणाऱ्या  विविध सुविधा बाबत पाहणी करत माहिती घेत समाधान व्यक्त केले.

यावेळी कल्याण आरटीओ उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय ससाणे, आय एच मासुमदार, मुंबई रिक्षा मेन्स युनियन पदाधिकारी तंबी कुरियन, शिरीष नाईक, विविध रिक्षा संघटना पदाधिकारी, आरटीओ अधिकारी कर्मचारी आदी मान्यवर उपस्थित होते. 

Web Title: RTO and Rickshaw Association's 'no horn pills' venture