आरटीओ विभागाला ब्रेक चाचणी ट्रॅकसाठी 27 जून पर्यंत मुदत 

RTO
RTO

मुंबई : प्रादेशिक परिवहन कार्यालयांमध्ये अवजड वाहनांच्या ब्रेकची चाचणी करण्यासाठी अडीचशे मीटर लांबीचे ट्रॅक बनवण्यासाठी 15 जूनपर्यंत मुदत उच्च न्यायालयाने दिली होती. ही मुदत 27 जून पर्यंत वाढवण्यात आले अाहे. मुंबईतील ब्रेक चाचणीसाठी एकाच ठिकाणी ऑटोमॅटिक सेंटर सुरू करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

मुंबई उच्च न्यायलयात श्रीकांत माधव कर्वे यांनी परिवहन विभागात सोई सुविधा नसल्याने जनहित याचिका दाखल केली होती. प्रादेशिक परिवहन कार्यालयांमध्ये अवजड वाहनांच्या ब्रेकची चाचणी करण्यासाठी अडीचशे मीटर लांबीचे ट्रॅक बनवण्यासाठी 15 जूनपर्यंत मुदत उच्च न्यायालयाने दिली होती. सध्या मुंबईतील कोणत्याच आरटीओ ऑफिसमध्ये 250 मीटरचे चाचणी ट्रॅक नाहीत. त्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाने परिवहन विभागाची खरडपट्टी काढली होती. उच्च न्यायालयाने दिलेली मुदत वाढवण्याची विनंती परिवहन विभागाने उच्च न्यायालायत केली होती. त्यानुसार उच्च न्यायालयाने मुंबई प्रादेशिक परिवहन विभागाने अडीचशे मीटर लांबीचे ट्रॅक बनवण्यासाठी केलेली कार्यवाही समाधानकारक नसल्याचे नमूद करून दोन आठवड्यात शपथ पत्र सादर करण्याचे आदेश दिले आहेत. 

मुंबईसाठी एकाच ठिकाणी होणार ऑटोमॅटिक सेंटर 
मुंबईत ताडदेव, वडाळा, अंधेरी येथे परिवहन विभागाची उपविभागीय कार्यालय आहेत. कार्यालयांमध्ये कोणत्याच ठिकाणी ब्रेक टेस्टींग ट्रँक नाहीत. मुंबईत जागेअभावी ब्रेक टेस्टिंग ट्रँक बनवणे अवघड आहे. त्यामुळे मुंबईतील ब्रेक टेस्टींगसाठी एकाच ठिकाणी ऑटोमॅटिक सेंटर सुरू करण्यात येणार आहे. ऑटोमेटेड सेंटर बसवल्यानंतर ते 24 तास कार्यरत राहील. त्यामुळे गाड्यांची ब्रेक चाचणी करणे सुलभ होईल. ऑटोमेटेड सेंटरमध्ये गाडी पळवावी लागत नाही. गाडी जागेवरच उभे असते. मात्र रोलरवर गाडीचे चाक पळवले जाते. त्यावरून ब्रेक लावून ब्रेक चाचणी करता येते. असे सेंटर नाशिक येथे बसवण्यात आले आहे. त्याधर्तीवरच मुंबईतही असे सेंटर सुरू करणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली. 

प्रादेशिक कार्यालय = दिवसाला ब्रेक चाचणी होणारी वाहनांची संख्या 

              टॅक्सी           रिक्षा.       जड वाहने 

वडाळा =  250.              200             50 

ताडदेव = 150                100            25

आंधेरी  =  200               150            30

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com