अफवांमुळे भीतीचे सावट

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 1 डिसेंबर 2018

नवी मुंबई - गोवर-रुबेला लसीकरणाची मोहीम सुरू झाली असतानाच वाशीतील एका खासगी शाळेतील मुलांना ही लस टोचल्यानंतर त्रास झाल्याची चर्चा सुरू झाली. त्यानंतर दोन दिवस अफवांना पेव फुटले आहे. शहरातील तब्बल साडेआठ लाख मुलांना ही लस देण्याचे लक्ष्य ठेवलेल्या पालिकेसाठी हे धक्कादायक आहे. 

सकाळचे मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा

नवी मुंबईकरांना आरोग्याच्या चांगल्या सोई देण्यासाठी पालिका आग्रही आहे. त्यामुळे मुलांच्या लसीकरणाच्या मोहिमांना महत्त्व देण्यात येत आहे. गोवर - रुबेला लसीबाबतही पालिकेने पुढाकार घेतला आहे. त्यानुसार तीन दिवसांत ही मोहीम जोशात सुरू झाली आहे. आतापर्यंत शहरातील तब्बल ५० हजार मुलांना ती देण्यात आली आहे; परंतु वाशीतील एका खासगी शाळेतील मुलांनी लसीकरणानंतर उलटी, पोटात मळमळणे अशा तक्रारी केल्यानंतर या महत्त्वाकांक्षी योजनेला खिळ बसण्याचा धोका निर्माण झाला होता. 

दरम्यान, या घटनेची चर्चा समाजमाध्यमांवर जोरदार सुरू झाली. त्यानंतर अफवांना पेव फुटले. पालकांवर त्यामुळे भीतीचे सावट आहे. 

गोवर, रुबेला. लसीकरणाबाबतच्या अफवांनी कोणी किती विश्‍वास ठेवावा, हे प्रत्येकाला समजायला हवे. 
- डॉ. दयानंद कटके, आरोग्य अधिकारी, महापालिका

Web Title: Rubella vaccination campaign start in navi mumbai