अर्ध्या किमतीत वाहन खरेदी अफवाच

सोशल मीडियावर व्हायरल झालेले  फोटो.
सोशल मीडियावर व्हायरल झालेले फोटो.

पनवेल : सोशल मीडियावर कधी काय अफवा पसरेल आणि त्या अफवेचे रूपांतर एखाद्या मोठ्या घटनेत कसे होईल, हे आता काही नवे राहिले नाही. याचा प्रत्यय पुन्हा एकदा पहायला मिळाला असून अर्ध्या किमतीत वाहनविक्री करण्यात येणार असल्याची अफवा पसरल्याने वाहन खरेदीसाठी कर्नाळा अभयारण्य परिसरातील एका गोदामात ग्राहकांनी गर्दी केली होती. वेळेनुसार गर्दी वाढतच असल्याने नियंत्रण मिळवण्यासाठी गोदाम मालकास पोलिसांना पाचारण करावे लागले. ही घटना शुक्रवारी (ता.१) सकाळच्या सुमारास घडली. 

पनवेल, नवी मुंबई परिसरात पुराच्या पाण्यात भिजलेली चारचाकी वाहने अर्ध्या किमतीत विकण्यास ठेवली असल्याचा मेसेज सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरला. काही दिवसांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे राज्यभरात अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. या परिस्थीमुळे अनेक भागातील गोदामांमध्ये पाणी भरल्याने गोदामात ठेवण्यात आलेल्या साहित्याची नासाडी झाली होती. अशाच एका गोदामात ठेवण्यात आलेली वाहने पुराच्या पाण्यात बुडाल्याने त्या वाहनांची विक्री १ नोव्हेंबरपासून ४५ टक्के सवलतींच्या दरात करण्यात येणार असल्याची माहिती सोशल मीडियाद्वारे पसरली. 

ही बातमी समजताच कर्नाळा परिसरात असलेल्या एका नामांकित वाहन कंपनीच्या गोदामावर ग्राहकांनी मोठी गर्दी केली होती. परिसरातील या गोदामावर झालेली गर्दी नियंत्रणात आणणे गोदाम चालकांना शक्‍य न झाल्याने त्यांना पोलिसांची मदत घ्यावी लागली. या वेळी गोदाम मालकाने वाहनविक्री करण्यासाठी अशी कोणतीही सवलत देण्यात आल्याच्या वृत्ताचे खंडन केले असून, अशी कोणतीही सवलत जाहीरच केली नसल्याचे सांगितले आहे.

कारवाईची गरज  
या घटनेमुळे पुन्हा एकदा सोशल मीडियाच्या माध्यमातून होणाऱ्या फसवणुकीचा मुद्दा समोर आला असून अशा अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com