अहमद पटेलांच्या भेटीवर काय म्हणतायत संजय राऊत..

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 13 नोव्हेंबर 2019

शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे आणि कॉंग्रेसचे जेष्ठ नेते अहमद पटेल यांच्यात मिटिंग झाली आणि यात आमच्यात काही फिक्स झालंय अश्या बातम्या काही माध्यमांनी दाखवल्यात. मात्र तसं काहीही नसून या बातम्या निव्वळ अफवा आहेत

महाराष्ट्रातील सत्तास्थापनेचा तिढा अजूनही सुटलेला नाही, अशातच काही अफवांना उधाण आलंय. शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे आणि कॉंग्रेसचे जेष्ठ नेते अहमद पटेल यांच्यात मिटिंग झाली आणि यात आमच्यात काही फिक्स झालंय अश्या बातम्या काही माध्यमांनी दाखवल्यात. मात्र, तसं काहीही नसून या बातम्या निव्वळ अफवा आहेत असं ट्विटरच्या माध्यमातून स्पष्ट करण्यात आलंय. 

 

 

 

हिंदी आणि इंग्रजीत ट्विट करत संजय राऊत यानी या भेटीबद्दल आपली भूमिका स्पष्ट केलीये. दरम्यान आमची बातचीत कॉंग्रेस आणी राष्ट्रवादी कॉंग्रेस सोबस्त सुरु असून फक्त अहमद पटेल यांच्याशी कोणतीही भेट झालेली नाही नाही असं उद्धव ठाकरेंच्या वतीने संजय राऊत यांनी स्पष्ट केलंय.

दरम्यान, महाराष्ट्रात शिवसेना राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेस एकत्रित सत्ता स्थापन करणार हे स्पष्ट झालंय. दरम्यान काही महत्त्वाच्या गोष्टींवर सध्या राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस आणि शिवसेना यांच्यात चर्चा सुरु आहे. मात्र मुख्यमंत्री शिवसेनेचा होणार ही  संजय राऊत यांची भूमिका स्पष्ट आहे.  

Webtitle : Rumours being floated that shivsena president uddhav Thackeray had meeting with Ahmed Patel says sanjay raut 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rumours being floated that shivsena president uddhav Thackeray had meeting with Ahmed Patel says sanjay raut