ग्रामीण भागातील निवासी अतिक्रमणे नियमित होणार

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 8 ऑगस्ट 2018

मुंबई - ग्रामीण भागातील प्रत्येक बेघराला घरकुल मिळवून देण्यासाठी प्रधानमंत्री आवास योजना राबविली जात आहे. याच मोहिमेचा भाग म्हणून ग्रामीण भागातील शासकीय जागांवरील निवासी अतिक्रमणे नियमित करण्याचा निर्णय शासनाने नुकताच घेतला आहे. राज्यातील अशा सर्व अतिक्रमणांची माहिती संकलित करण्यासाठी मोबाईल ऍप विकसित करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. सह्याद्री अतिथीगृह येथे आज फडणवीस यांच्या हस्ते आणि ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, राज्यमंत्री दादाजी भुसे यांच्या प्रमुख उपस्थितीत या मोबाईल ऍपचा शुभारंभ करण्यात आला.
Web Title: rural area encroachment continue Prime Minister Home Scheme