पेट्रोल पंपावर टॅंक फूल करण्यासाठी झुंबड 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 12 नोव्हेंबर 2016

कांदिवली - पेट्रोल पंपावर शुक्रवारी मध्यरात्रीपर्यंत जुन्या 500 व हजारच्या नोटा स्वीकारल्या जाणार असल्याने दोन दिवसांपासून पेट्रोल पंपावर गर्दी होत आहे. शुक्रवारी मध्यरात्रीनंतर सहा तास पेट्रोल पंप बंद राहणार असल्याने टॅंक फूल करण्यासाठी वाहनचालकांची झुंबड होत आहे. 

पेट्रोल पंपावर गर्दी वाढत असल्याने बेशिस्त वाहनचालकांमुळे वादावादी होत आहे. कांदिवली-पश्‍चिम महावीर नगर लिंक रोडवर भारत पेट्रोल पंप आहे. या पेट्रोल पंपावर चारचाकी वाहने मोठ्या प्रमाणात येत असल्याने दुचाकीस्वारांची अडचण होत आहे. त्यामुळे दुचाकी, चारचाकी व मोठ्या गाड्यांच्या तीन रांगा लिंक रोडवर दोन किलोमीटपर्यंत रांगा लागल्याचे दिसते. त्यामुळे वाहतुकीची कोंडी होत आहे. उशीर होत असल्याने मध्य घुसणे, विनाकारण हॉर्न वाजवणे यासारखे प्रकार होत आहेत. गर्दी वाढत असल्याने पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांचाही गोंधळ होत आहे. 

या पेट्रोल पंपावर नेहमी गर्दी असते. मात्र, केंद्र सरकारच्या निर्णयामुळे जुन्या नोटा संपवण्यासाठी गर्दी वाढली आहे. मध्यरात्रीपासून सहा तास पंप बंद राहणार असल्याने दक्षता म्हणून काही जण टॅंक फूल करून घेत आहेत. त्यामुळे दुचाकीस्वारांची अडचण होत आहे. कर्मचारी वेगाने काम करत सर्वांना सहकार्य करत आहेत. 

-तुषार कडधेकर (पेट्रोल पंप सुपरवायझर). 

गर्दी वाढल्याने कर्मचाऱ्यांनी तत्परता दाखविली पाहिजे. लिंक रोडवरील पेट्रोल पंपाला मोठी जागा हवी. मात्र, साताठ गाड्या थांबतील एवढीच जागा असल्याने अडचण होत आहे. 

- अमित वाघ (वाहनचालक).

Web Title: rush on petrol pump

टॅग्स