MSRTC News : गौरी,गणपती हंगामात एसटी कर्मचारी बेमुदत उपोषणावर

११ तारखेपासून आझाद मैदानात एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू मागण्यांकडे लक्ष न दिल्यास जिल्हा पातळीवरही कर्मचारी उपोषण करणार.
st bus
st bus sakal

मुंबई - राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी ४ टक्के महागाई भत्ता देऊन एसटी कर्मचाऱ्यांची बोळवण केली आहे. खरतर शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे एसटी कर्मचाऱ्यांना एकूण ८ टक्के महागाई भत्ता वाढ करणे गरजेचे होते.

शिवाय इतर आर्थिक प्रलंबित मागण्यांकडे सुद्धा राज्य सरकारने दुर्लक्ष केल्याने राज्य एसटी कामगार संघटना ११ सप्टेंबर रोजी बेमुदत आमरण उपोषणावर ठाम आहे. सोमवारी दुपारी १२ वाजता पासून आझाद मैदानावर आंदोलनाला सुरुवात होणार असल्याचे अध्यक्ष संदीप शिंदे यांनी सांगितले आहे.

यादरम्यान आंदोलनातील प्रलंबित मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास १३ सप्टेंबर पासून जिल्हा पातळीवर सुद्धा एसटी कर्मचारी आंदोलनात सहभागी होऊन बेमुदत आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा सुद्धा शिंदे यांनी दिला आहे.

st bus
Pune News : बारामतीकरांनी अनुभवला दहीहंडीचा थरार...

काय आहे मागण्या

- शासकीय कर्मचा-यांप्रमाणे एसटी कर्मचाऱ्यांना ४२ टक्के महागई भत्ता द्यावा

- महागाई भत्याची वर्ष २०१८ पासूनची थकबाकीही देण्यात यावी.

- वर्ष २०१६-२०२० च्या कामगार करारातील १२०० कोटीपेक्षा जास्त थकबाकी कामगारांना त्वरीत द्यावी

st bus
Pune : माळेगाव कारखान्याचे अध्यक्ष, उपाध्यक्षांचा राजिनामा मंजूर,खांदेपालट होण्यावर शिक्कामोर्तब

२०१६-२०२० च्या एकतर्फी वेतनवाढीतील शिल्लक रक्कमेचे वाटप कामगारांच्या मूळ वेतनामध्ये करावे

- मूळ वेतनात जाहिर केलेले ५,०००, ४,००० आणि २,५०० या रक्कमेमुळे अनेक सेवाजेष्ठ कर्मचा-यांच्या वेतनातील त्रुटी दूर करावी

- काही महामंडळास व संस्थांच्या धर्तीवर एसटी महामंडळाला ही ७ वा वेतन आयोग लागू करावा

st bus
Mumbai News : डोंबिवलीत अपहरण करून धावत्या रिक्षात महिलेवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न,झटापटीत पोलिस जखमी

शासनाने मान्य केल्याप्रमाणे एसटी महामंडळास आर्थिक सहाय्य मिळावे, प्रवाशी जनतेस अधिक दर्जेदार सेवा देण्यासाठी येत असलेले अडथळे दूर करावेत. एकतर्फी वेतनवाढीचा फरक, रजा रोखीकरण इत्यादी प्रलंबित देणी तात्काळ अदा करावीत.

वाहकांना ई.टी.आय, मशिन नादुरूस्त असल्यामुळे प्रवाशांना तिकिट देण्यास अडचणी निर्माण होत आहेत. तरी चांगल्या प्रतीच्या अँड्रॉईड ई.टी.आय. मशिन देण्यात याव्यात, कामगारांच्या सदर प्रलंबित आर्थिक व इतर मुद्यांची सोडवणूक राज्य सरकारने लवकर करावी.

संदीप शिंदे, अध्यक्ष, राज्य एसटी कामगार संघटना

Related Stories

No stories found.
Sakal
www.esakal.com