Saamana Paper : एकीकडे सरकारवर कठोर टीका; दुसरीकडे त्यांचीच पहिल्याच पानावर पानभर जाहिरात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Saamana Front Page
Saamana Paper : एकीकडे सरकारवर कठोर टीका; दुसरीकडे त्यांचीच पहिल्याच पानावर पानभर जाहिरात

Saamana Paper : एकीकडे सरकारवर कठोर टीका; दुसरीकडे त्यांचीच पहिल्याच पानावर पानभर जाहिरात

सामना हे शिवसेनेचं मुखपत्र सातत्याने चर्चेत असतं. अग्रलेखातली कठोर भाषा, त्यातून सरकारवर केलेली टीका यावरुन कायमच मोठा गदारोळ होत असतो. आता अग्रलेखासोबत सामना पेपरच्या पहिल्या पानाचीही आता चर्चा होऊ लागली आहे.

सामना या शिवसेनेच्या मुखपत्रातून राज्य सरकार तसंच केंद्र सरकारवर सातत्याने टीका केली जाते. सरकारच्या धोरणावरुन त्यांना धारेवर धरलं जातं. या सगळ्यावर अनेकदा सरकारमधल्या नेत्यांकडून, मंत्र्यांकडून प्रत्युत्तरं दिली जातात, टीकाटिप्पण्यांचं सत्र रंगतं. एकीकडे एवढी टीका करत असताना दुसरीकडे त्यांचीच जाहिरात सामनाने पहिल्या पानावर छापली आहे.

saamana Paper

saamana Paper

त्यामुळे एकीकडे कठोर टीका आणि दुसरीकडे त्यांचीच पहिल्या पानावर पानभर जाहिरात यामुळे आता सामना पुन्हा चर्चेचा विषय बनला आहे. स्वातंत्र्याची 75 वर्ष एका वर्षात 75 हजार रोजगार देण्याचा महाराष्ट्राचा महासंकल्प पहिल्या टप्यातील नियुक्तीपत्रे प्रदान करण्याचा राज्यस्तरीय कार्यक्रमाची ही जाहिरात आहे. या कार्यक्रमाला पंतप्रधान मोदी ऑनलाईन पद्धतीने उपस्थित राहणार आहे.

या जाहिरातीवर नरेंद्र मोदी, आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे फोटो आहेत. तसंच शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचाही नियुक्तीपत्र देतानाचा फोटो लावलेला आहे. आज 11 वाजता यशवंतराव चव्हाण येथे हा कार्यक्रम होणार आहे.

टॅग्स :Shiv Senaadvertisement