
लसकर- ए- कोरोना सामनामध्ये हेडिंग दिल्यानंतर मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी संजय राऊत यांनी टीका केली आहे.
मुंबईः सामनामध्ये कोरोना लसीकरणाच्या बातमीला लसकर-ए-कोरोना असं शिर्षक देण्यात आलं आहे. लसकर- ए- कोरोना सामनामध्ये हेडिंग दिल्यानंतर मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी संजय राऊत यांनी टीका केली आहे. संदीप देशपांडे यांनी दैनिक सामनामध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीचा फोटो शेअर करत संजय राऊत यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे.
लष्कर-ए-तोयबा ही अतिरेकी संघटना असून लोकांना मारायचं काम करते तर कोरोनाची लस ही लोकांना वाचवण्याचं काम करते. त्यामुळे कंपाऊंडर चुकले तरी काय वाईट संगतीचा परिणाम त्यांच्यावर झाला आहे, अशी टीका संदीप देशपांडे यांनी संजय राऊत यांच्यावर केली. तसंच कोरोनाच्या लसीची तुलना लष्कर-ए-तोयबा बरोबर कशी केली जाऊ शकते, असा सवाल देशपांडे यांनी उपस्थित केला आहे.
करोना च्या लशीची तुलना लष्कर ए तोयबा बरोबर ?? " कंपौंडर" डोक्यावर पडलेत का??? pic.twitter.com/ICshB7hAss
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) January 17, 2021
महाराष्ट्रातील लसीकरणाबाबतची बातमी सामनामध्ये प्रसिद्ध झाली आहे. या बातमीचं शिर्षक लसकर-ए-कोरोना असं देण्यात आले आहे. मनसे नेते संदीप देशपांडे यांनी लसकर-ए-कोरोनाचा संदर्भ घेत शिवसेना आणि संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला.
मुंबई विभागातल्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
Saamana newspaper vaccination Header Sandeep Deshpande Criticism Sanjay Raut